नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन समाप्त

By admin | Published: July 26, 2014 02:24 AM2014-07-26T02:24:24+5:302014-07-26T02:24:24+5:30

राज्यातील सर्व परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध

Municipal corporation employees' agitation ends | नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन समाप्त

नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन समाप्त

Next

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : सुधारित आकृतिबंद आराखड्यानुसार होणार नियुक्या
गोंदिया :
राज्यातील सर्व परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १५ जुलैपासून बेमुदत आंदोलन सुरू केले होते. २३ जुलै रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने न.प. कर्मचाऱ्यांनी आपले बेमुदत आंदोलन समाप्त केले.
प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे व इतर पदाधिकाऱ्यांनी २३ जुलै रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्याशी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. चर्चेनुसार, नगर परिषद कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना १०० टक्के वेतन शासनाद्वारे दिला जाईल. तसेच नगर परिषदेच्या सन २००० पूर्वीच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी सुधारित आकृतीबंद आराखडा तयार करून त्यात नियुक्ती करण्यासाठी कार्यवाही केली जाईल. याशिवाय इतर मागण्यांवरही सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिले. त्यामुळे नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना मान्य करण्यासाठी मुख्यमंत्री चव्हाण, नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, तसेच महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे, संघटनेचे इतर पदाधिकारी व चर्चेत उपस्थित इतर लोकप्रतिनिधी यांचे महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटना शाखा गोंदियाचे अध्यक्ष छेदीलाल ईमलाह यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
शहरात अस्वच्छता कायम
नगर पालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सफाई कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता. शासनाने २३ जुलै रोजी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन समाप्त झाले. पण गोंदिया शहरातील अस्वच्छता कायमच आहे. शुक्रवारी शहराचा फेरफटका मारला असता ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य आढळले. आंदोलन संपल्यावर नगर परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सफाई कामगारांकडून शहराची स्वच्छता करून घेतली नाही काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Web Title: Municipal corporation employees' agitation ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.