ठाणेदारासह पाचजणांवर खुनाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:22 AM2021-05-29T04:22:33+5:302021-05-29T04:22:33+5:30

नरेश रहिले गोंदिया : आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आलेल्या चोरीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी राजकुमार अभयकुमार (वय ...

Murder case against five persons including Thanedar | ठाणेदारासह पाचजणांवर खुनाचा गुन्हा

ठाणेदारासह पाचजणांवर खुनाचा गुन्हा

Next

नरेश रहिले

गोंदिया : आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आलेल्या चोरीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी राजकुमार अभयकुमार (वय ३०, रा. कुंभारटोली) याला तुरुंगातच बेदम मारहाण करण्यात आली. या बेदम मारहाणीमुळे राजकुमार याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आमगावच्या ठाणेदारासह पाचजणांवर खून केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून दोनवेळा संगणक संच व एलसीडीची चोरी करणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० मे रोजी ताब्यात घेतले होते. मात्र त्यात एक अल्पवयीन बालक असल्याने त्याला सोडून तिघांना अटक करून आमगाव पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या प्रकरणात कुंभारटोली येथील राजकुमार अभयकुमार याला बेदम मारहाण झाल्यानेच त्याचा मृत्यू झाला. यामुळे मृत्यूला जबाबदार आमगावचे ठाणेदार सुभाष सदाशिव चव्हाण (वय ४१), सहायक पोलीस निरीक्षक महावीर शिवाजी जाधव (४०), ठाणेदाराचा वाहनचालक पोलीस हवालदार खेमराज मार्कंड खोब्रागडे (५२, बक्कल नंबर १०१४), पोलीस शिपाई अरुण देवाजी उईके (३३, बक्कल नंबर १८७७) व दत्तात्रय ज्ञानोबा कांबळे (३३, बक्कल नं. १७८०) यांच्यावर सीआयडीचे पोलीस निरीक्षक विनोद वाकडे यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, ३३०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमगाव पोलीस ठाण्यातील अप क्र ७०/२०२१ कलम ४६१,३८०,३४ या गुन्ह्याचा तपास करताना आमगाव पोलिसांनी अटक आरोपी राजकुमार अभयकुमार याला बेदम मारहाण केल्यामुळे पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात सीआयडीने आमगाव येथील न्यायाधीशांच्या उपस्थितीत या घटनेतील आय विटनेस सुरेश धनराज राऊत व राजकुमार गोपीचंद मरकाम यांचे बयाण नोंदविले. त्यांनीही आमगाव पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. आमगाव पोलिसांनी लाकडी दांडा व पट्ट्याने जबर मारहाण केल्यामुळे राजकुमारचा मृत्यू झाला आहे.

बॉक्स

साीयआयडीने केले पुरावे गोळा

आमगाव येथील पोलीस कोठडीत राजकुमारचा मृत्यू झाला. त्यासंदर्भात सीआयडीने आतापर्यंत केलेल्या चौकशीत इन्क्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, साक्षीदारांचे जबाब, घटनास्थळावरील पुरावे यांचे अवलोकन करून ठाणेदार सुभाष चव्हाण, एपीआय महावीर जाधव, वाहनचालक खेमराज खोब्रागडे, पोलीस शिपाई अरुण उके यांनी अपराध क्रमांक ३२६/२०२० भादंविचे कलम ४५७,३८० मधील चोरीचा माल हस्तगत करण्यासाठी आमगाव पोलिसांनी अटक असलेल्या आरोपींना लाकडी दांडा असलेल्या पट्टयाने व हाता-पायाने बेदम मारहाण केली. त्याचा जीव जाऊ शकतो, याची माहिती असतानाही राजकुमार अभयकुमार याला पट्टयाने व हाता-पायाने डोक्यात, पाठीवर, पायावर, हातावर, तळपायावर, कानावर, मानेवर मारहाण करून जीव घेतल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे.

Web Title: Murder case against five persons including Thanedar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.