संगीत हे जीवनातील अथांग सागरासारखे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:20 AM2021-07-04T04:20:10+5:302021-07-04T04:20:10+5:30
केशोरी : संगीत हे शिक्षण अथांग सागरासारखे आहे. आपण जेवढा संगीत ज्ञानाचा अभ्यास करू तेवढ्या जोमाने व्यक्तीच्या मनातील अहंकार ...
केशोरी : संगीत हे शिक्षण अथांग सागरासारखे आहे. आपण जेवढा संगीत ज्ञानाचा अभ्यास करू तेवढ्या जोमाने व्यक्तीच्या मनातील अहंकार नाहीसा होऊन मन:शांती मिळत असते. संगीत शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीची प्रतिभा फुलविण्याचे काम संगीत शिक्षक करीत असतो. प्रत्येकाने संगीत विषयाचे ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन ठाणेदार संदीप इंगळे यांनी केले.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई या संस्थेने केशोरी येथे नवीन संगीत विद्यालय सुरू केले असून, डॉ. राधाकृष्ण हायस्कूल येथे आयोजित सरस्वती संगीत विद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सरपंच नंदू पाटील गहाणे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणेदार संदीप इंगळे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून योगेश नाकाडे, सचिन फटिंग, वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल, डॉ. जतिन मंडल, हरिराम पेशने, पो.पा. नाना पेंदाम, मुख्याध्यापक संजय भांडारकर, अनिल लाडे, ग्रा.पं. सदस्य अरुण मस्के, प्रा. मुरलीधर मानकर, संगीत शिक्षक किशोर बावने, इरफान खान, बबलू नेवारे, गोलू पिलारे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी सरस्वती मातेच्या प्रतिभेचे पूजन आणि दीप प्रज्वलित केल्यानंतर ठाणेदार संदीप इंगळे यांनी फीत कापून सरस्वती संगीत विद्यालयाचे उद्घाटन केले. संगीत या विषयाने विद्यार्थ्यांचे आयुष्य घडत असते. स्वातंत्र्य पूर्व काळात आपल्या स्वातंत्र्यवीरांना तुरुंगाची शिक्षा व्हायची तेव्हा तुरुंगात संगीत ऐकून आणि पुस्तके वाचून ठरलेली शिक्षा आनंदाने भोगल्याने त्यांच्या मनातील दु:ख नाहीसे होत होते, असे मौलिक मार्गदर्शन करून या गावाच्या कुशीत दडलेल्या किंवा संगीत विषयाची आवड असणाऱ्या कलाकारांना उंच उडी घेण्याची संधी सरस्वती संगीत विद्यालयाने उपलब्ध करून दिली असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. प्रास्ताविक कोमल शेंडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रकाश वलथरे यांनी केले. आभार गुणवंत पेशने यांनी मानले.