कोटरा येथे मोहरी क्षेत्रीय दिन व किसान गोष्टी कार्यक्रम ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:27 AM2021-02-14T04:27:23+5:302021-02-14T04:27:23+5:30
अध्यक्षस्थानी आत्माचे एस.आर.पुस्तोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी मित्र किशोर वालदे, मुख्याध्यापक एस.सी.वाढई, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष ग्यानीराम भेंडारकर, ...
अध्यक्षस्थानी आत्माचे एस.आर.पुस्तोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी मित्र किशोर वालदे, मुख्याध्यापक एस.सी.वाढई, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष ग्यानीराम भेंडारकर, कृषी मित्र मोतीराम भेंडारकर, कृषी सहायक एच.टी.नागपुरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामचंद्र बहेकार तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी सहायक सुभाष नागदेवे उपस्थित होते.
या कार्यक्रमात भाताच्या क्षेत्रात विशेष करून रबी हंगामात भात पिकाला पर्याय म्हणून मोहरी पीक घेऊन मोहरीचे महत्त्व, उद्देश व त्याचे फायदे इत्यादी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच कृषी विभागाच्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा, प्रधानमंत्री पिकविमा योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, शतकोटी वृक्षलागवड योजना, यांत्रिकीकरण योजना आदी विषयांची माहिती दिली. माती परीक्षणाचे महत्त्व, माती परीक्षणाचे फायदे यासह कीटकनाशक फवारताना घ्यायची काळजी, भाताच्या लागवडीच्या विविध पद्धती, हरभरा लागवड पद्धत, भात व हरभरा पिकावरील रोग किडींचे एकात्मिक व्यवस्थापन व उपाय अशा अनेक विषयांवर सखोल मागदर्शन करण्यात आले. संचालन करून आभार कृषी सहायक सुभाष नागदेवे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रगतिशील सेतकरी अंबरलाल भोयर, धनराज गायधने, धनराज हत्तीमारे यांच्यासह मोठ्या संख्येत शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते.