मायबाप सरकार तुम्हीच सांगा आम्ही नेमके कोणत्या प्रवर्गात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 05:00 AM2021-09-05T05:00:00+5:302021-09-05T05:00:02+5:30
प्रत्येक प्रवर्गाला त्यांच्या हिस्स्याचे जे जे काही आहे ते शासनातर्फे मिळते. पण सोनझारी समाजाचा कुठल्याच प्रवर्गात समावेश नसल्याने देशातील साऱ्या सोई-सुविधांपासून कोसो दूर आहेत. नाल्या नदीतील रेतीतून सोन काढणे. मातीतून सोने काढणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आणि म्हणून त्यांना सोनझारी हे नाव पडलं असावं. चाळणीसारख्या लोखंडाच्या धातूतून सोनं काढण्यासाठी त्यांची भटकंती चाललेली असते.
अंकुश गुंडावार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नदी, नाले, रेती आणि मातीतून सोने शोधून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या सोनझारी समाजबांधवांना स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांनंतरही शासकीय दस्तावेजात आपण कुठल्या प्रवर्गात हे शोधण्यात यश आले नाही. शासन आणि प्रशासनाच्या दप्तर दिंरगाईमुळे अजुनही या समाजाचा कुठल्याच प्रवर्गात समावेश झाला नसल्याने शासकीय योजनांपासून वंचित राहून उपेक्षितांचे जिणे जगावे लागत आहे. त्यामुळे हे समाजबांधव मायबाप सरकार तुम्हीच सांगा आम्ही कोणत्या प्रवर्गात असा सवाल शासनाला करीत आहे.
प्रत्येक प्रवर्गाला त्यांच्या हिस्स्याचे जे जे काही आहे ते शासनातर्फे मिळते. पण सोनझारी समाजाचा कुठल्याच प्रवर्गात समावेश नसल्याने देशातील साऱ्या सोई-सुविधांपासून कोसो दूर आहेत. नाल्या नदीतील रेतीतून सोन काढणे. मातीतून सोने काढणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आणि म्हणून त्यांना सोनझारी हे नाव पडलं असावं. चाळणीसारख्या लोखंडाच्या धातूतून सोनं काढण्यासाठी त्यांची भटकंती चाललेली असते. पहांदी पारी कुपार लिंगो बहुउद्देशीय संस्थेने गोंदिया जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार ९३२ या जिल्ह्यात आहेत. आता हे लोक शिक्षणाच्या प्रवाहात येऊन राहिलेले आहेत. दहावीच्यावर कुणीच शिकलेले नाहीत. सोन काढण्यासाठी या प्रांतातून त्या प्रांतात या देशातून त्या देशात भटकत असल्यामुळे कुटुंबासोबत लहान मुलेही जातात. साहजिकच त्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होते.
सोन्यासारख्या जीवनाची होतेय माती
- या समाजात जात-पंचायत असते. समाजाचे संपूर्ण निर्णय ही जातपंचायत घेत असते. एवढेच नाही तर सहसा आपल्या कुटुंबातील लोकांना रुग्णालयातसुद्धा ते घेऊन जात नाही. जात पंचायतीचा निर्णय मानला नाही तर सामाजिक बहिष्काराला त्या कुटुंबाला सामोरे जावे लागते. त्यांची आडनावे नेताम, सयाम, टेकाम अशी आहेत. संस्थेने केलेल्या सर्वेनुसार तत्कालीन एचडीओ यांनी एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट केले होते. अन् काही दिवसानंतर नोटीस देऊन त्यांच्याकडून प्रमाणपत्र मागवून घेण्यात आले. त्यांच्या समाजाचे संपूर्ण नियमसुद्धा अतिशय वेगळे आहेत. सोन्याच्या शोधात त्यांच्या सोन्यासारख्या जीवनाची माती होत आहे.
केवळ झरेका उल्लेख नसल्याने प्रवर्ग नाकारला
- हा प्रश्न केवळ गोंदिया जिल्ह्याचाच नसून संपूर्ण भारतात सोनझारी समाजाला प्रवर्ग मिळाला नाही. अनुसूचित जमातीच्या असलेल्या जातीच्या अनुसूचीमध्ये १८ व्या क्रमांकावर सोनझारी झरेका त्यांचा उल्लेख राजगोंड म्हणून केलेला आहे. पण सोनझारी लिहिलेला आहे आणि झरेका लिहिलं नाही म्हणून त्यांना प्रवर्ग नाकारल्या गेला. सोन्याच्या शोधात सतत त्यांची भटकंती चालत असल्यामुळे शिक्षणाकडे पूर्णतः दुर्लक्ष त्यांचे होत आहे. त्या मुलांसाठी कायमस्वरूपी निवासी शाळा निर्माण झाल्या तर नक्कीच त्यांच्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही.
पहांदी पारी कुपार लिंगो बहुउद्देशीय संस्थेने गोंदिया जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार ९३२ या जिल्ह्यात आहेत. आता हे लोक शिक्षणाच्या प्रवाहात येऊन राहिलेले आहेत. मात्र शासनाने यांचा कुठल्याच प्रवर्गात समावेश न केल्याने त्यांना सोयी सुविधांपासून सोनझारी समाजबांधव वंचित आहे.
- सविता बेदरकर, अध्यक्ष पहांदी पारी कुपार लिंगो बहुउद्देशीय संस्था