नगर पंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:25 AM2017-12-04T00:25:15+5:302017-12-04T00:26:35+5:30

नगर पंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. राजकीय पक्षांनी प्रचारास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी उमेदवार आणि मतदार यांच्यामध्ये तणाव निर्माण होतानाचे चित्र दिसत नाही. परंतु आता चौकाचौकांत निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

Nagar Panchayat election schedule | नगर पंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरू

नगर पंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरू

Next
ठळक मुद्देवीज, पाणी, रस्त्यांसह हाताला काम द्या : बाकलसर्राचे ज्वलंत मुद्दे


विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : नगर पंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. राजकीय पक्षांनी प्रचारास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी उमेदवार आणि मतदार यांच्यामध्ये तणाव निर्माण होतानाचे चित्र दिसत नाही. परंतु आता चौकाचौकांत निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. नगर पंचायतवर कुणाची सत्ता येईल, सत्तेवर आल्यास कोणत्या कामावर लक्ष देण्यात येईल, कोणकोणत्या समस्या दूर होतील, कोणाला निवडून देणे योग्य ठरेल, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
बाकलसर्रा गावातील नगर पंचायतच्या प्रभाग क्रमांक १ आणि २ येथे जवळपास ८५ घरे आहेत. या गावातील लोक ७५ टक्के आदिवासी, मागासलेले आहेत. इतर २५ टक्के लोक पोवार, लोधी, हलबी, लोहार, एस.सी. इत्यादी जातीचे आहेत. ते काही प्रमाणात शेतीवर तर मोठ्या प्रमाणात वनोपज व मोल मजूरीवर अवलंबून आहेत. कामाअभावी येथील लोक शहराकडे पलायन करुन कुटुंबासाठी उदरनिर्वाहाचे साधन शोधतात, हे या गावचे वैशिष्ट आहे.
या गावाला भेट दिली असता दोन्ही वॉर्डांची सद्यस्थिती आणि समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तालुका मुख्यालयापासून ५ किमी. अंतरावर असलेला प्रभाग १ आणि २ बाकलसर्रा या गावात जाताना ३ किमी. जंगलातून मार्गक्रमण करावे लागते. गावापर्यंत जाण्यासाठी पक्का डांबरीकरण रस्ता बनला आहे. परंतु त्या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती झाली नसल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या गावात पोहोचताच गावकरी मोठ्या उत्सुकतेने भेटून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत गावातील समस्या मांडू लागतात. दुर्गम व संवेदनशील भागात मोडत असलेला बाकलसर्रा गाव विकासाच्या प्रवाहात मुळीच आला नाही. गावातील सर्वच घरे कौलारू आहेत. आदिवासी मागासलेल्या बेरोजगार युवकांचा लोंढा या गावात आहे. लोकांचे राहणीमान पारंपरिक व मागासलेले आहे. अडीच वर्षांपूर्वी नगर पंचायत स्थापन होऊन प्रशासक बसविण्यात आले. परंतु येथे विकासाचे कोणतेच काम झाले नाही. २०० मीटर रस्ता खडीकरणाचा आहे, परंतु सदर रस्ता लवकर पक्का सिमेंटचा तयार व्हावा, अशी मागणी लोकांची आहे.
गावात रस्त्याच्या एका बाजूला नाली बांधकाम झाले, ते ग्रामपंचायत असताच बनले होते. परंतु नालीचा उपसा झाला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी नाल्या जमिनीत गळप झाल्या आहेत. सौर उर्जेचे दिवे बंद पडले आहेत. रात्रीला या गावातील दोन्ही वॉर्डात काळोख पसरला असतो. गावात एकूण सात बोअरवेल असून उन्हाळ्यात सर्व बोअरवेल बंद असतात. गावाबाहेरील शेतात खासगी बोअरवेलच्या भरवशावर पाणी मिळवावे लागते. गावात एका ठिकाणी बोअरवेल अनेक दिवसांपासून बंद पडलेली आहे. परंतु तिची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला नाही.
पुढे एका ठिकाणी नालीचा उपसा झालेला दिसला. परंतु नालीतील घाण व माती तिथेच पडून होती. प्रशासक बसल्यापासून फक्त स्वच्छ भारत मिशनच्या कामांतर्गत या गावात सार्वजनिक शौचालयांसह ९५ टक्के कुटुंबाला शौचालयांची सोय झाली आहे. काही लोक अजूनही उघड्यावरच जाणे पसंत करताना समजले. दोन ठिकाणी कचरापेट्या लागून होत्या. परंतु गावात स्वच्छतेचे प्रमाण कमी दिसून आले. पिण्याच्या पाण्याची नळाद्वारे कायमची व्यवस्था करुन शुद्ध पाणी मिळावे, पथदिवे लावण्यात यावे, अशी मागणी लोकांनी केली आहे.

Web Title: Nagar Panchayat election schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.