मुख्याधिकाऱ्यांच्या दबंगशाहीने नगरपंचायत भ्रष्टाचाराच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:30 AM2021-09-19T04:30:05+5:302021-09-19T04:30:05+5:30

सालेकसा : कोविड काळात सभा व नगरसेवकांना विश्वासात न घेता मुख्याधिकाऱ्यांनी अमाप किमतीत कोरोना साहित्य खरेदी करून बनवाबनवीचे बिल ...

Nagar Panchayat in the grip of corruption due to the tyranny of the Chief Minister | मुख्याधिकाऱ्यांच्या दबंगशाहीने नगरपंचायत भ्रष्टाचाराच्या विळख्यात

मुख्याधिकाऱ्यांच्या दबंगशाहीने नगरपंचायत भ्रष्टाचाराच्या विळख्यात

Next

सालेकसा : कोविड काळात सभा व नगरसेवकांना विश्वासात न घेता मुख्याधिकाऱ्यांनी अमाप किमतीत कोरोना साहित्य खरेदी करून बनवाबनवीचे बिल जोडून देयक काढले असल्याचा आरोप उपाध्यक्ष प्रल्हाद वाढई व नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केला.

ग्राम हलबिटोला येथील श्री अर्धनारेश्वरालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत खुद्द नगरपंचायत उपाध्यक्ष वाढई यांच्यासह नगरसेवक कृष्णा भसारे, वंदना क्षीरसागर, श्यामकला प्रधान, शशिकला ढेकवार, सयन प्रधान व सफाई कामगारांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दबंगशाही कारभार व भ्रष्टाचाराची गाथा मांडली. याप्रसंगी त्यांनी, घनकचरा संकलन करण्याकरिता ई-निविदा काढली व काम राजीव सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्यादित खुरखुडी यांना देण्यात आले. त्यामध्ये शासन नियमाप्रमाणे कामगारांची दैनिक मजुरी ५४२ रुपये आहे; पण पुरुषांना २२० रुपये तर महिलांना मात्र १४० रुपये मजुरी दिली जाते. कामगारांची रजिस्टरवर रेव्हेन्यू स्टॅम्प लावून कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेतली जात आहे. कामगारांनी विरोध दर्शविल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी मुख्याधिकारी देतात, तसेच कंत्राटदाराकडून घनकचरा कर्मचाऱ्यांचा ईपीएफ भरणा केला जात नसून, कंत्राटदार व मुख्याधिकारी कर्मचाऱ्यांचे शोषण करीत आहेत. एवढेच सभेची प्रोसिडिंग नेहमी दोन-तीन पदाधिकाऱ्यांच्या हुकूमशाहीने नगरसेवकांना विश्वासात न घेता पडद्याआड बदलविली जात असल्याचा आरोपही पदाधिकारी व सदस्यांनी केला आहे.

-------------------------------

अन्यथा नगर पंचायतला कुलूप ठोकणार

नगर पंचायतमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी जिल्हाधिकारी नयना गुंडे व खासदार अशोक नेते यांना निवेदन देण्यात आले आहे. योग्य ती कारवाई करण्यात आली नाही तर नगरपंचायतला कुलूप ठोकून धरणे आंदोलन करणार, असा इशारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपाध्यक्ष वाढई यांच्यासह नगरसेवक व सफाई कामगारांनी दिला आहे.

...............

वाहन खरेदीत घोळ

नगरसेवकांना विश्वासात न घेता नगराध्यक्ष व मुख्याधिकारी मनमर्जीने कारभार करीत आहेत. नुकतेच नगरपंचायतमार्फत अग्निशमन गाडीची खरेदी ९५ लाख रुपयांत करण्यात आली; मात्र या गाडीची कंपनीची मूळ किंमत २५ लाख रुपये आहे, तसेच ३ हाॅपर टिप्परची प्रत्येकी २१ लाख रुपये प्रमाणे खरेदी करण्यात आली आहे. अग्निशमन गाडीची खरेदी मॉडेल नंबर १२०० टाटा योद्धा मिधी इंटरप्राईजेस पुणे येथून केली असता, खरेदी किंमत ६६ लाख ६८ हजार ४८८ रुपये दाखविण्यात आली आहे. खरेदी केलेल्या गाड्यांच्या किमतीची शहानिशा केली असता, मूळ किमतीपेक्षा दुप्पट किंमत दाखवून खरेदी करण्यात आली आहे. नगरपंचायतमध्ये दोन सेनेटरी मशीन असून, त्यांचा कसलाही उपयोग होत नसल्याचा आरोप केला आहे.

Web Title: Nagar Panchayat in the grip of corruption due to the tyranny of the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.