नागपूर पोलिसांनी घेतली सोंटू जैनच्या दुकानाची झडती; आठ दहा अधिकाऱ्यांची चमू दाखल

By अंकुश गुंडावार | Published: October 26, 2023 08:52 PM2023-10-26T20:52:42+5:302023-10-26T20:52:52+5:30

सट्टाकिंग सोंटू जैन याला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली सुरु आहे.

Nagpur police searched Sontu Jain's shop! | नागपूर पोलिसांनी घेतली सोंटू जैनच्या दुकानाची झडती; आठ दहा अधिकाऱ्यांची चमू दाखल

नागपूर पोलिसांनी घेतली सोंटू जैनच्या दुकानाची झडती; आठ दहा अधिकाऱ्यांची चमू दाखल

गोंदिया : सट्टाकिंग सोंटू जैन याला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली सुरु आहे. गुरुवारी (दि.२६) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास नागपूर पोलिसांनी सोंटू जैनच्या गोरेलाल चौकातील कुर्तावाला या दुकानावर धडक दिली. तसेच दुकानात प्रवेश करुन झाडझडती घेतली. रात्री उशीरापर्यंत नागपूर पोलिस सोंटूच्या दुकानात चौकशी करीत होते.

सट्टाकिंग सोंटू जैन याच्या मोबाइलमधील डेटा मिळाल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. याच डेटाच्या आधारावर पोलिसांनी पाच दिवसांपूर्वी गोंदिया येथील डॉ. गौरव बग्गा व ॲक्सिस बँकेचे व्यवस्थापक अंकेश खंडेलवाल यांच्यावर कारवाई केली. तर मोबाइल डेटामध्ये सोंटू जैनने आर्थिक व्यवहार केलेल्यांची नाव समोर आल्याची माहिती आहे. नागपूर आर्थिक शाखेचे पोलिस सध्या सोंटूची कसून चौकशी करीत आहे. यात अनेक नवीन माहिती पुढे येत आहे. दरम्यान गुरुवारी सांयकाळी नागपूर येथील आर्थिक शाखेचे आठ दहा अधिकाऱ्यांचे पथक गोंदिया येथे दाखल झाले. यानंतर पथकाने स्थानिक गोरेलाल चौकातील सोंटू जैन याच्या मालकीच्या कुर्तावाला या दुकानात धडक दिली. दरम्यान या पथकाने या कारवाईबाबत अद्यापही कसलीही माहिती दिली नसून रात्री उशीरापर्यंत सोंटूच्या दुकानात नागपूर पोलिस झाडझडती घेत चौकशी करीत होते. या कारवाईमुळे सोंटू जैनशी निगडीत असलेल्यांचे धाबे दणाणले होते.

सोंटूचे दुकान होते मुख्य केंद्र

सट्टाकिंग सोंटू जैन हा सट्टयाची सर्व सूत्र ही गोरेलाल चौकात असलेल्या त्याच्या दुकानातून चालवित होता. पण अद्याप पोलिसांनी या दुकानाची झाडझडती घेतली नव्हती. गुरुवारी प्रथमच नागपूर पोलिसांनी त्याच्या दुकानावर धडक देत चौकशी केली.

Web Title: Nagpur police searched Sontu Jain's shop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.