नागपूरचा फुटाळा तलाव अवतरणार गोंदियात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 09:31 PM2018-04-09T21:31:12+5:302018-04-09T21:31:12+5:30
नागपूर येथील फुटाळा तलावाच्या धर्तीवर येथील सिव्हील लाईन्स परिसरातील बोडीच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. येत्या पावसाळ्याच्या पूर्वी सौंदर्यीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले जाणार असल्याचे नगर परिषदेच्या बांधकाम विभागाकडून कळले. फुटाळा तलावा प्रमाणेच बोडीचे सौंदर्यीकरण होणार असल्याने फुटाळा तलावच गोंदियात अवतरणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नागपूर येथील फुटाळा तलावाच्या धर्तीवर येथील सिव्हील लाईन्स परिसरातील बोडीच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. येत्या पावसाळ्याच्या पूर्वी सौंदर्यीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले जाणार असल्याचे नगर परिषदेच्या बांधकाम विभागाकडून कळले. फुटाळा तलावा प्रमाणेच बोडीचे सौंदर्यीकरण होणार असल्याने फुटाळा तलावच गोंदियात अवतरणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
सिव्हील लाईन्स परिसरातील बोडीचे सौंदर्यीकरण व्हावे ही प्रत्येकच सिव्हील लाईन्सवासीची इच्छा होती. मागील कित्येक वर्षांपासूनची त्यांची ही इच्छा आता पूर्णत्वास येत आहे. कारण, बोडीच्या सौंदर्यीकरणाच्या कामाला जोमात सुरूवात झाली आहे. येत्या पावसाळ््यापूर्वी सौंदर्यीकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करावयाचे असल्याची माहिती नगर परिषद बांधकाम विभागाचे अभियंता श्रीकांत डोंगरे यांनी दिली.
हे काम कंत्राटदार श्याम चंदनकर यांना देण्यात आले असून यात सुमारे जीड कोटींचा खर्च केला जाणार आहे. सध्या सौंदर्यीकरणातंर्गत पाथवेचे काम सुरू आहे. बोडीच्या सौंदर्यीकरणाचे काम फुटाळा तलावाप्रमाणे केले जात असल्याची माहिती आहे. असे झाल्यास येथे सकाळी व सायंकाळी फिरणाऱ्यांची गर्दी होणार. परिणामी शहरातील सुभाष बागेत वाढणारी गर्दी कमी होणार आहे. विशेष म्हणजे, येथे दुकानी लागणार व लोकांची गर्दी वाढणार असल्यामुळे येथील दृष्ट बघण्याजोगे राहणार.
सौंदर्यीकरणात ही कामे होणार
बोडीच्या सौंदर्यीकरणांतर्गत चारही बाजूंनी सुरक्षा भिंतीचे काम करण्यात आले आहे. या भिंतीला लागून वृक्षारोपण केले जाणार आहे. चारही बाजूंनी पाथवे तयार केले जात असून त्याला सुरक्षेच्या दृष्टीने रेलींग लावली जाणार आहे. पाथवेवर आकर्षक लाईटींगची व्यवस्था केली जाणार आहे. या शिवाय एक टँक तयार केले जात असून पाण्याने भरून राहणाºया या टँकमध्ये उतरणे व चढण्यासाठी चारही बाजूंनी पायºया तयार केल्या जाईल.
दुसऱ्या टप्प्यात कारंजे लागणार
या टँकमध्ये कारंजे लावले जाणार असून हे काम दुसºया टप्प्यात केले जाणार आहे. सध्या या कामासाठी ड्रॉर्इंग तयार केली जात आहे. या कामासाठी निधी उपलब्ध होताच व पावसाळा संपल्यानंतर कारंजे लावण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता जुनघरे यांनी दिली.