नागरा तीर्थक्षेत्र विकासकामांचा घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:52 AM2018-09-05T00:52:00+5:302018-09-05T00:52:24+5:30

येथून सुमारे ४ किमी अंतरावरील नागरा तीर्थक्षेत्राकरिता मंजूर विविध विकासकामांचा आढावा घेत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी स्वत: नागरा तलावाची पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी उपस्थित अधिकाºयांना निधी लोकहितार्थ खर्च करण्याचे निर्देशही दिले.

Nagra Pilgrimage Development Works | नागरा तीर्थक्षेत्र विकासकामांचा घेतला आढावा

नागरा तीर्थक्षेत्र विकासकामांचा घेतला आढावा

googlenewsNext
ठळक मुद्देआमदार अग्रवाल यांनी केली तलावाची पाहणी : निधी लोकहितार्थ खर्च करण्याचे दिले अधिकाऱ्यांना निर्देश, परिसराचा होणार कायापालट

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथून सुमारे ४ किमी अंतरावरील नागरा तीर्थक्षेत्राकरिता मंजूर विविध विकासकामांचा आढावा घेत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी स्वत: नागरा तलावाची पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी उपस्थित अधिकाºयांना निधी लोकहितार्थ खर्च करण्याचे निर्देशही दिले.
सुमारे ८०० वर्षांपेक्षा जास्त प्राचीन इतिहास लाभलेल्या ग्राम नागरा येथील प्राचीन शिव मंदिराची दूरवर ख्याती आहे. या प्राचीन तिर्थक्षेत्राला त्याचा हक्क मिळवून देत आमदार अग्रवाल यांनी नागराला ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला. यातूनच महाराष्ट्र राज्य तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत दोन कोटींचा निधी शिव मंदिर परिसर विकास तसेच १ कोटींचा निधी बायपास रस्ता भूमिअधिग्रहणासाठी मंजूर करण्यात आला आहे. यातून मंदिर परिसरात भक्त निवास, सुरक्षा भिंत, शौचालय, सिमेंट व डांबरी रस्ते, पथदिवे व पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली जाणार आहे.
या सर्व विकासकामांचा आढावा घेत आमदार अग्रवाल यांनी मंदिर समिती व स्थानिक नागरिकांच्या गरजा जाणून घेण्यासाठी अधिकाºयांसह नागराला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी नागरा तलावाची पाहणी केली. तसेच दोन कोटींचा निधी लोकहितांच्या कामात खर्च करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, तहसीलदार सी.आर. भंडारी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, अर्जुन नागपुरे, रमेश लिल्हारे, चमनलाल बिसेन, पुष्पा अटराहे, रमेश लिल्हारे, माधुरी हरिणखेडे, ओमप्रकाश भक्तवर्ती, अमृतलाल पतेह, दुर्गाप्रसाद धांदे, प्रकाश रहमतकर, सुरेंद्र गणवीर, मिना लिल्हारे, बिंदू गिरी, पुष्पा ढेकवार, निर्मला कुंडभरे, नंदा मस्के, प्रितलाल पतेह, हितेश चिखलोंडे, घनश्याम लिल्हारे, विवेकानंद पंचबुद्धे, योगेश्वरी पगरवार, टेकलाल चिखलोंडे, चंदनलाल चिखलोंडे, मदन दमाहे, लिखीराम पगरवार, प्रभुलाल शेंडे, कृष्णा बांते, तुकाराम धांदे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
बायपास रस्त्यातील खोडा हटला
नागरा शिव मंदिरात जाण्यासाठी सध्या गावातील अंरूद मार्गाने जावे लागते. यामुळे गावकºयांना त्रास होऊ नये या दृष्टीने आमदार अग्रवाल यांनी बायपास रस्त्यासाठी प्रयत्न के ले होते. यातूनच रस्ता मंजूर करवून बायपास रस्त्याच्या निर्मितीसाठी भूमी अधिग्रहण प्रक्रीया केली जात आहे. मात्र यात भूधारक द्विवेदी यांनी विरोध केला होता. याबाबत उपविभागीय अधिकारी वालस्कर यांनी आमदार अग्रवाल यांना माहिती दिली. यावर आमदार अग्रवाल यांनी द्विवेदी यांना धार्मिकस्थळाच्या विकास कामात सहकार्य करण्याची विनंती केली होती. तसेच शासन अधिग्रहित होणाºया जागेचे बाजारभावापेक्षा जास्त भाव देणार असल्याचे त्यांना सांगीतले. आमदार अग्रवाल यांच्या विनंतीवरून द्विवेदी यांनीआपली सहमती दर्शविली. ज्यामुळे बायपास रस्त्याच्या निर्मितीतील खोडा आता हटला आहे.

Web Title: Nagra Pilgrimage Development Works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.