फिरायला गेलेल्या मित्र-मैत्रीणीला केले नग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 09:23 PM2018-11-18T21:23:32+5:302018-11-18T21:23:56+5:30
कारंजा येथील २० वर्षाची तरुणी व फुलचूर येथील २२ वर्षाचा तरुण हे दोघेही २९ आॅगस्टला दुपारी १२ वाजता पांगडी जंगलात फिरायला गेले. ते परत येत असताना लोधीटोला येथील दोन तरुण व चुटीया येथील एक अशा तिघांनी चाकूचा धाक दाखवून त्या मित्र-मैत्रिणीला नग्न केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कारंजा येथील २० वर्षाची तरुणी व फुलचूर येथील २२ वर्षाचा तरुण हे दोघेही २९ आॅगस्टला दुपारी १२ वाजता पांगडी जंगलात फिरायला गेले. ते परत येत असताना लोधीटोला येथील दोन तरुण व चुटीया येथील एक अशा तिघांनी चाकूचा धाक दाखवून त्या मित्र-मैत्रिणीला नग्न केले. इतकेच नव्हे तर त्या तरुणीचा नग्न अवस्थेत लैगिंक छळ केला. यासर्व प्रकाराचा व्हिडिओ तयार करुन व्हॉट्सअॅपवर व्हायरल करुन दोघांची बदनामी केली. या तिघांविरुद्ध गंगाझरी पोलिसात १७ नोव्हेंबरला गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तिघांना ही अटक केली आहे.
दोघे मित्र-मैत्रिणी पांगडी जंगलात फिरायला जात असताना पाऊस सुरु झाल्यामुळे ते जंगलातून परत गोंदियाकडे जाण्यासाठी निघाले. परंतु रस्त्यावर आरोपी मेघनाथ पटले चुटिया, विकेश उर्फ काका भय्यालाल गावराणे व रितीक संजू ठाकरे रा.लोधीटोला यांनी त्या तरुणाच्या गाडीला अडवून चाकूचा धाक दाखविला. त्यांना जंगलात ओढत नेवून दोघांचे दुपट्याने हात बांधले. एवढेच नव्हे तर त्या दोघांना झाडाला बांधून खिशातील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल व ८ हजार रुपये रोख बळजबरीने काढून घेतले. त्या मित्र-मैत्रिणीला बळजबरीने एकमेकास चुंबन घेण्यास सांगितले. त्यानंतर दोघांना नग्न करुन आरोपी रितीक ठाकरे व मेघनाथ पटले यांनी तिच्याशी अश्लिल चाळे करुन मोबाईलमध्ये शुटींग केली.
या प्रकरणाची वाच्यता कुणाकडे केली तर युट्यूब व सोशल मिडीयावर तुझी बदनामी करु अशी धमकी दिली. त्यानंतर संजू ठाकरे यांनी लोधीटोला येथील त्या तरुणीचा मित्र दुर्गा अटरे यांच्या व्हॉट्सअॅपवर तो अश्लिल विडीओ पाठविला. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा त्याचा दुसरा मित्र शनी यांच्यासमोर त्या मुलाला धमकावून १५ हजार रुपयाची मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर वायरल करु अशी धमकी दिली.
तक्रारीवरुन सदर घटनेसंदर्भात गंगाझरी पोलिसांनी भादंविच्या कलम ३४१, २४२, ३५४ अ, ब, ३७६ ड, ३८५, ३९७, ५०४, ५०६ सहकलम ६६ ई, ६७, ६७ अ माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर तिन्ही आरोपींना अटक केली असून मोबाईल व ८ हजार रुपये रोख स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केले.