नाल्यावरील स्लॅब तुटले ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:26 AM2021-07-26T04:26:55+5:302021-07-26T04:26:55+5:30
साखरीटोला : येथे करण्यात आलेल्या नाली बांधकामांतर्गत नाल्यांवरील झाकणाचे स्लॅब तुटून पडत आहेत. शिवाय त्यातील लोखंडी सळ्या वर येत ...
साखरीटोला : येथे करण्यात आलेल्या नाली बांधकामांतर्गत नाल्यांवरील झाकणाचे स्लॅब तुटून पडत आहेत. शिवाय त्यातील लोखंडी सळ्या वर येत असल्याने येथे अप्रिय घटनेची शक्यता नाकारता येत नाही. या निकृष्ट बांधकामाऐवजी नव्याने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
आमगाव-देवरी रस्त्याचे सिमेंटीकरण व त्यातच रुंदीकरणाचे काम एका कंपनीद्वारे केले जात आहे. त्यात रस्त्याच्या बाजूला गावात नाली बांधकाम केले जात आहे. या नाली बांधकामांतर्गत नाल्यांवर कॉंक्रिटचे झाकण लावण्यात आले आहे. मात्र ते निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे कित्येक ठिकाणी तुटून पडले असून त्यातील लोखंडी सळ्या वर आल्या आहेत. येथील प्रदीप अग्रवाल यांच्या घरासमोरील नालीवर हाच प्रकार घडला आहे. अशात तुटलेल्या झाकण व वर आलेल्या सळ्यांमुळे खादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदर घरातील लोकांना धोका निर्माण झाला आहे. यामुळे कोणतीही हानी होऊ नये म्हणून घरासमोरील लोकांनी नालीवर लाकडी पाटी लावून ठेवली आहे. तसेच कंपनीने या बांधकामाकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.