कर्जाच्या नावावर ७३ शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 01:07 AM2019-02-14T01:07:09+5:302019-02-14T01:07:42+5:30

कर्ज देण्याच्या नावावर ७३ शेतकºयांना लुबाडणाºया पाच पैकी तिघांना आमगाव पोलिसांनी सोमवारी अटक केली. यातील दोन आरोपी फरार आहेत. प्रथम तक्रारीत २ लाख ८० हजारांनी फसवणूक झाल्याचे म्हटले असले तरी संपूर्ण चौकशी झाल्यावर कोट्यवधी रुपयाने फसवणूक झाल्याचे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

In the name of loan 73 farmers cheated | कर्जाच्या नावावर ७३ शेतकऱ्यांची फसवणूक

कर्जाच्या नावावर ७३ शेतकऱ्यांची फसवणूक

Next
ठळक मुद्देतिघांना अटक दोन फरार : २ लाख ८० हजारांनी फसवणूक झाल्याची प्रथम तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कर्ज देण्याच्या नावावर ७३ शेतकºयांना लुबाडणाºया पाच पैकी तिघांना आमगाव पोलिसांनी सोमवारी अटक केली. यातील दोन आरोपी फरार आहेत. प्रथम तक्रारीत २ लाख ८० हजारांनी फसवणूक झाल्याचे म्हटले असले तरी संपूर्ण चौकशी झाल्यावर कोट्यवधी रुपयाने फसवणूक झाल्याचे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
आमगावच्या रिसामा येथील सुरज कवडू वाढई (२१) यांनी आमगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी मानसी कंन्सल्टसी प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या नावाने ४५ दिवसात कर्ज मंजूर करू देतो कर्जाकरीता अनामत रक्कम म्हणून ४ हजार ५०० रूपये घेण्यात आले. आरोपींनी यासाठी एजंट सुध्दा नेमले. परंतु त्या एजंटनी लोकांकडून पैसे वसूल करून त्या कंपनीच्या संचालकांना दिले. मे २०१८ ते ८ फेब्रुवारी २०१९ या काळात मानसी कंन्सल्टसी प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या नावावर २ लाख ८० हजार ५०० रूपये ७३ शेतकºयांकडून घेण्यात आले. परंतु ४५ दिवस लोटूनही कुणालाही कर्ज मंजूर केले नाही. मानसी कंन्सल्टसी प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या नावाने बनावट ओळखपत्र तयार करून नोकरी लावून देण्याच्या नावावरही तयार केलेल्या एजंटची फसवणूक करण्यात आली. नोकरीच्या नावावर एजंट तयार करण्यात आल्यामुळे आता त्या एजंटाचीही गोची झाली आहे.
आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यातील ७३ लोकांची फसवणूक केली. शेतकरी, शेतमजूर, कामगार अशा गरीबांची फसवणूक करण्यात आली. यासंदर्भात आमगाव पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४७१, १२० ब, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणात मध्यप्रदेशच्या बालाघाट येथील विरेंद्र भाटकर (२८), मिलेंद्र प्रेमलाल बागडे (३८), भंडारा जिल्ह्याच्या पिंपरी येथील बसंत राऊत (४३) यांना ९ फेब्रुवारीला अटक करण्यात आली. तर लोकेश चव्हाण व शुभम शरणागत हे दोघे फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने १६ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे यांनी केली.

जाळे वर्धा, चंद्रपूर, लातूरपर्यंत
मानसी कंन्सल्टसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे लोन देण्याच्या नावावर शेतकरी,शेतमजूर, कामगार यांच्याकडून लुटणाºया या लोकांचे जाळे वर्धा, चंद्रपूर लातूरपर्यंत असल्याचे चौकशीत पुढे येत आहे. दरम्यान आत्तापर्यंत या आरोपींनी कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. .

Web Title: In the name of loan 73 farmers cheated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.