पोलिसांच्या देवरी कॅम्प निवासस्थानाला ‘रिव्यानी’चे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:04 AM2019-01-07T00:04:18+5:302019-01-07T00:04:58+5:30

अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या देवरी कॅम्प येथील निवासस्थानाचे ‘रिव्यानी’ असे नामकरण आज (दि.६) करण्यात आले. या माध्यमातून रिव्यानीच्या स्मृतींना नेहमी उजाळा मिळत राहावा, हा मागील उद्देश आहे.

Name of the name 'Rivni' to the police's Deewree Camp residence | पोलिसांच्या देवरी कॅम्प निवासस्थानाला ‘रिव्यानी’चे नाव

पोलिसांच्या देवरी कॅम्प निवासस्थानाला ‘रिव्यानी’चे नाव

Next
ठळक मुद्देअधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती : रिव्यानीच्या स्मृतींना उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या देवरी कॅम्प येथील निवासस्थानाचे ‘रिव्यानी’ असे नामकरण आज (दि.६) करण्यात आले. या माध्यमातून रिव्यानीच्या स्मृतींना नेहमी उजाळा मिळत राहावा, हा मागील उद्देश आहे.
रिव्यानी ही गोंदिया पोलीस दलातील पोलीस कर्मचारी शासकीय वाहन चालक राधेश्याम रहांगडाले यांची ६ वर्षांची मुलगी होती. २७ एप्रिल २०१८ रोजी रस्ता अपघातात जखमी झालेली रिव्यानी आठवडाभर कोमात होती. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. राधेश्याम रहांगडाले यांनी आपल्या मुलीचे अवयव दान केले. रिव्यानीचे दोन डोळे, फुप्फुस, हृदय, किडनी, त्वचा एकूण सात अवयव लहान गरजू मुलांसाठी दान केले. यामुळे दोन तीन बालकांना जीवनदान मिळाले. रिव्यानीच्या आई-वडिलांनी यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद होता. त्यांची ही कृती त्यांचे दातृत्व स्पष्ट करणारी आहे.
रिव्यानीच्या पवित्र स्मृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने देवरी कॅम्पच्या वतीने रविवारी सदर नामकरण सोहळा घेण्यात आला.
सदर फलकाचे अनावरण रिव्यानीचे वडील राधेश्याम रहांगडाले, आई यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्र माला अप्पर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, देवरी उपमुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी, सी ६० पथकाचे सर्व अधिकारी, कमांडर तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.@

Web Title: Name of the name 'Rivni' to the police's Deewree Camp residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस