गरिबांना डावलून यादीत श्रीमंतांची नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 12:13 AM2018-07-08T00:13:53+5:302018-07-08T00:15:53+5:30

तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम गराडा येथील ग्रामपंचायतमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या यादीत घोळ झाल्याचा आरोप ग्रामसभेत करण्यात आला. ग्रामपंचायतमध्ये कार्यरत संगणक चालकाने यादीतील नावांचा क्रम बदलविल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.

The names of the rich in the list of poor people | गरिबांना डावलून यादीत श्रीमंतांची नावे

गरिबांना डावलून यादीत श्रीमंतांची नावे

googlenewsNext
ठळक मुद्देपंतप्रधान आवास योजना : गराडा ग्रामपंचायतमधील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम गराडा येथील ग्रामपंचायतमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या यादीत घोळ झाल्याचा आरोप ग्रामसभेत करण्यात आला. ग्रामपंचायतमध्ये कार्यरत संगणक चालकाने यादीतील नावांचा क्रम बदलविल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.
प्राप्ता महितीनुसार, गराडा ग्रामपंचायतची ग्रामसभा २२ नोव्हेंबर २०१७ रोजी सरपंचांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली होती. यात गरीब लाभार्थ्यांना डावलून श्रीमंत लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आल्याचा आरोप काही लोकांनी केला. ग्रामसभेत याचा विरोध केला होता. तसेच योग्य लाभार्थ्यांची यादी तयार करुन लाभ देण्याची मागणी केली होती. यादीत गराडा ग्रामपंचायतमध्ये कार्यरत संगणक चालक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे समोर होती. तर गरिबांची नावे मागे टाकण्यात आल्याचा आरोप आहे. सविता ज्ञानेश्वर आमकर, छगण ताराचंद रहांगडाले, बलराज मेश्राम, ताराचंद उके, चैतराम शेंदरे, शकुंतला मेश्राम, केवल बावनकर, दामोदर हेडाऊ, महादेव साठवणे, राधा बारापात्रे, हरिचंद बिसेन, अशोक उके, कमला उके, लहू शेंडे, रवि उके, हिवराज पारधी यांना घरकुल आवश्यक असल्याचा ठराव ग्रामसभेत पारीत करण्यात आला.
मात्र अद्यापही खंड विकास अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून त्यांना राहण्यासाठी चांगले घर नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यानी याची दखल घ्यावी व ग्रामसभेच्या ठरावाला केराची टोपली दाखविणाऱ्या विस्तार अधिकारी व खंडविकास अधिकारी यांच्यावर गुन्हा नोंद करुन कार्यवाही करण्याची मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्याय महाराष्ट्र शाखेचे जिल्हा संघटक सुनील बारापात्रे, मोहन ग्यानचंदानी, सुरेश धुर्वे, सहादेव आमकर, सरपंच जगदेव आमकर व १०७ सदस्यांनी निवेदन देऊन केली आहे.

Web Title: The names of the rich in the list of poor people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.