राष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धेला आजपासून सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 05:00 AM2019-12-26T05:00:00+5:302019-12-26T05:00:10+5:30

२३ व्या ज्युनियर व २१ व्या सिनीयर राष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणावर २६ ते २९ डिसेंबर दरम्यान आयोजित केली असल्याचे ऑल महाराष्ट्र सायकल पोलो असोसिएशन व भारतीय सायकल पोलो महासंघाचे महासचिव गजानन बुरडे येघे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

National Cycle Polo Championship begins today | राष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धेला आजपासून सुरूवात

राष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धेला आजपासून सुरूवात

googlenewsNext
ठळक मुद्दे२५ राज्यातील ७०० खेळाडू होणार सहभागी : जिल्हा सायकल पोलो असोसिएशन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा सायकल पोलो असोसिएशन, ऑल महाराष्ट्र सायकल पोलो असोसिएशन व सायकल पोलो फेडरेशन आॅफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने १७ व्या सबज्युनियर, २३ व्या ज्युनियर व २१ व्या सिनीयर राष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणावर २६ ते २९ डिसेंबर दरम्यान आयोजित केली असल्याचे ऑल महाराष्ट्र सायकल पोलो असोसिएशन व भारतीय सायकल पोलो महासंघाचे महासचिव गजानन बुरडे येघे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेला जिल्हा सायकल पोलो असोसिएशनचे उपाध्यक्ष गजेंद्र फुंडे, सचिव महेंद्र हेमणे, सदस्य रंजीत गौतम उपस्थित होते. सायकल पोलो स्पर्धेमध्ये एका चमूमध्ये ८ खेळाडूंचा समावेश असतो. यात ४ फेऱ्यांचा सामना होतो. प्रत्येक फेरीमध्ये खेळाडू बदलले जाऊ शकतात. खेळाडू जखमी झाला तर बदल केला जाऊ शकतो. एकदा बाहेर झालेल्या खेळाडू त्यावेळी पुन्हा स्पर्धेत घेता येत नाही. महाराष्ट्राच्या संघात गोंदियाचा कोच राहणार असून त्यासाठी निवड होणे व्हायची असल्याचे बुरडे यांनी सांगितले. स्पर्धेतील सामने दररोज सकाळी ८.३० ते ४.३० वाजताच्या दरम्यान घेण्यात येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या व तृतीय क्रमांकाच्या संघाला चषक, पदके, मेरीट प्रमाणपत्र तसेच इतर सर्व सहभागी खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक, अधिकारी व पदाधिकारी यांना सहभाग प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे.

७०० खेळाडू होणार सहभागी
गोंदियात प्रथमच राष्ट्रीय स्तराची सायकल पोलो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात २५ राज्यातील जवळपास ६०० ते ७०० खेळाडू सहभागी होणार आहे. सध्या १६ राज्यातील चमूंची नोंदणी झालेली आहे. चमू येण्यास सुरवात झाली असून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, बंगाल, तामीळनाडू, केरळ, राजस्थान, कर्नाटक व आंध्रप्रदेश या दहा राज्यातील चमू गोंदियात पोहचली आहे. तेलंगाना, बिहार, उडीसा, हरियाणा, पंजाब, झारखंड व गोवा या सहा राज्यातील चमू यायची आहे.

आज होणार स्पर्धेचे उद्घाटन
या राष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धेचे उद्घाटन गुरूवारी (दि.२६) दुपारी ३ वाजता जिल्हा क्रीडा संकुल, मरारटोली येथे नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या हस्ते, गोंदिया शिक्षण संस्थेचे संचालक निखील जैन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या वेळी प्रामुख्याने जिल्हा क्र ीडा अधिकारी मुस्ताक पटेल, पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, गजानन बुरडे, ऑल महाराष्ट्र सायकल पोलो असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनेश सार्वे, गोंदिया जिल्हा साकयल पोलो असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार कुथे, न. प.उपाध्यक्ष शिव शर्मा उपस्थित राहणार आहेत.

Web Title: National Cycle Polo Championship begins today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.