राज्यमार्ग राष्ट्रीय मार्गात परिवर्तित होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2016 02:45 AM2016-02-20T02:45:39+5:302016-02-20T02:45:39+5:30

गोंदिया-बालाघाट-शिवनीकडे जाणाऱ्या राज्य मार्गाचे परिवर्तन राष्ट्रीय मार्गात करण्याकरिता या मार्गाचे रूंदीकरण त्वरित होणार.

National Highways will be converted into National Highway? | राज्यमार्ग राष्ट्रीय मार्गात परिवर्तित होणार ?

राज्यमार्ग राष्ट्रीय मार्गात परिवर्तित होणार ?

googlenewsNext

जिज्ञासा वाढली : भ्रामक अफवेने नागरिक भयभीत
रावणवाडी : गोंदिया-बालाघाट-शिवनीकडे जाणाऱ्या राज्य मार्गाचे परिवर्तन राष्ट्रीय मार्गात करण्याकरिता या मार्गाचे रूंदीकरण त्वरित होणार. त्यामुळे इमारती जमीनदोस्त होणार असल्याच्या भीतीने मार्गाच्या कडेला वास्तव्य करणारे नागरिक या अफवेने हादरुन गेले आहेत. हा मार्ग नेमका किती मीटर रुंद होणार, या बाबी जाणून घेण्याची जिज्ञासा नागरिकांत वाढली आहे.
काही व्यक्तींनी स्वत:चे हीत साधून हा आंतरराष्ट्रीय मार्ग ५० ते ६० मीटर रुंद होणार. यात बऱ्याच मोठ-मोठ्या इमारती जमीनदोस्त होणार. मार्गाला लागून असलेले लहानमोठे व्यवसाय पूर्ण मोडकडीस येऊन ठप्प पडतील व आपल्या भूखंडाना चांगले मोलभाव मिळणार, अशा अपेक्षा बाळगून काही संधिसाधू व्यक्ती भ्रामक अफवा पसरवीत आहेत. या भ्रामक अफवा जनसामान्यापर्यंत वणव्यासारख्या पसरल्या आहेत. राज्यमार्गाचे परिवर्तन होऊन अर्ध्या गावाचे उच्चाटनच होणार असल्याचा हा अप्रचार अनेक महिन्यांपूर्वीपासून गावात सुरु आहे.
यासाठी संबंधित विभागाने या प्रकाराची दखल घेऊन या भ्रामक अफवेवर अंकुश लावण्याच्या हेतूने खरी माहिती जनतेच्या संशयाचे समाधान करण्याकरिता प्रकाशित करावी. तसेच नागरिकांच्या मनात उत्पन्न झालेला संशय कायमचा दूर करण्यात यावा, अशी अनेक सुज्ज्ञ नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)

‘कही खुशी, कही गम’चे वातावरण
गोंदिया-बालाघाट-शिवणीकडे जाणाऱ्या राज्यमार्गाचे परिवर्तन राष्ट्रीय मार्गात होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. इमारती पडून नुकसान सहन करावे लागणार या भीतीने रस्त्यावरचे घरमालक व व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. तर आपल्या मालमत्तेचे चांगले मोलभाव मिळणार, अशी अपेक्षा काहीजण बाळगत आहेत. त्यामुळे कही खुशी कही गम असे वातारवण दिसून येते.

Web Title: National Highways will be converted into National Highway?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.