राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन २४ रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:20 AM2021-06-22T04:20:15+5:302021-06-22T04:20:15+5:30
बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय ओबीसी ...
बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, गोवाचे प्रदेशाध्यक्ष मधू नाईक, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश भगरथ, युवा अध्यक्ष राष्ट्रीय सुभाष घाटे, प्रदेशाध्यक्ष युवा चेतन शिंदे, प्रदेशाध्यक्ष महिला महासंघ कल्पना मानकर, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे राजाध्यक्ष श्याम लेडे, महिला अध्यक्ष रजनी मोरे, विद्यार्थी महासंघाचे रोहित हरणे, रमेशचंद्र घोलप व सर्व शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्र व राज्य शासन ओबीसींचे प्रश्न सोडवीत नसल्यामुळे आंदोलनाची गरज असल्याचे मत डॉ. अशोक जीवतोडे यांनी मांडले. डॉ. बबनराव तायवाडे यांनी निवडणुकीपूर्वी ओबीसींची जातनिहाय जनगणना करू, असे आश्वासन केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी दिले होते; मात्र आता गृहराज्यमंत्री किशन रेडी यांनी जातनिहाय जनगणना होणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका या बैठकीत जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाद्वारे २४ जूृनला राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.