एस.चंद्रा महिला महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:29 AM2021-03-05T04:29:09+5:302021-03-05T04:29:09+5:30
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. चंदा गावंडे यांनी आपल्या मार्गदर्शनात विज्ञान हे कुतूहलावर आधारित असल्याचे सांगत डॉ. सी. ...
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. चंदा गावंडे यांनी आपल्या मार्गदर्शनात विज्ञान हे कुतूहलावर आधारित असल्याचे सांगत डॉ. सी. व्ही. रमन यांच्याद्वारे लावण्यात आलेल्या रमन इफेक्ट या संशोधनाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. डॉ. तृष्णा कळंबे यांना आपल्या मार्गदर्शनात मानवी जीवनातील विज्ञानाचे महत्त्व विशष केले. डॉ. ललीतकुमार ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या बाजूला घडत असलेल्या घटनांचे वैज्ञानिक दृष्टीने अवलोकन करावे व त्यातून घडत असलेल्या विविध घटनांचा चिकित्सात्मक अभ्यास करण्यास सांगितले. याप्रसंगी बी. एस. सी. च्या विद्यार्थिनीद्वारे विज्ञान दिनानिमित्त पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले हाेते. यात सीमा मडावी, नेहा ठाकरे, वनिता नेवारे, प्रतिमा भंडारकर, प्रणाली मेश्राम, आशा भगत, किरण रामटेके, योगिता भांडारकर, रिहाना शेख यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन सीमा मडावी हिने केले तर आभार प्रतिमा भांडारकर यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. प्रमोद सरदार, प्रा. भावना खापर्डे, डॉ. ललीतकुमार ठाकूर, डॉ. अजय मुन, प्रा. स्वप्नील भगत, प्रा. दिक्षा बडोले, जयेश शहारे, मंगलदास गोंडाणे, राजेश हातझाडे, थानसिंग ठाकूर, हेमकृष्ण कठाणे, अमर गोडसे, राहुल मेश्राम, निर्दोश शहारे उपस्थित होते.