झालीया येथे राष्ट्रीय पाणी पुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2017 12:08 AM2017-05-18T00:08:51+5:302017-05-18T00:08:51+5:30

राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायत झालीया अंतर्गत ...

National Water Supply Scheme | झालीया येथे राष्ट्रीय पाणी पुरवठा योजना

झालीया येथे राष्ट्रीय पाणी पुरवठा योजना

googlenewsNext

भूमिपूजन : १.१० कोटींची योजना
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायत झालीया अंतर्गत एक कोटीं १० लाखांची योजना मंजूर करण्यात आली असून योजनेचे भूमिपूजन करीत झपाट्याने कामाला सुरुवात करण्यात आली आहे. योजनेचे काम १८ महिन्यांंंत पूर्ण करण्याची मुदत असली तरी येत्या तीन महिन्यांत काम पूर्ण करुन आॅगस्ट महिन्यापर्यंत लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल असा विश्वास ग्राम पंचायत झालीयाचे सरपंच मनोज दमाहे यांनी व्यक्त केला आहे.
पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ आमगाव-देवरी क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार भेरसिंह नागपुरे, सरपंच मनोज दमाहे, उपसरपंच हेमराज सुलाखे, पोलीस पाटील कविता कुराहे, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रिकापुरे, तंमुस अध्यक्ष धरमदास कुराहे, गादीप्रसाद भगत, राजेंद्र शेंडे, ग्रामसेवक प्रिती साखरे व इतर मान्यवर मंडळी आणि गावकरी बांधव उपस्थित होते.
वाघनदीच्या काठावर साखरीटोला घाटाजवळ स्थापित होत असलेली ही राष्ट्रीय पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायत झालीया अंतर्गत साखरीटोला, झालीया, पोवारीटोला आणि गोंडीटोला या चार गावांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करणारी असेल. या योजनेतून एकूण ७१५ कुटुंबातील तीन हजार २०० लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल. ही योजना सुरू झाल्याने झालीया ग्राम पंचायतीतील पाणी टंचाईच्या मोठ्या समस्येवर मात करण्यात येईल. त्यामुळे चारही गावातील लोक मोठ्या अपेक्षेने या योजनेकडे बघत आहेत.
या योजनेचे श्रेय आ. संजय पुराम यांना दिले जाते. असे उद्गार सरपंच मनोज दमाहे यांनी केले आहे. यावेळी पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी अभियंता व इतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी सुनिता नागपुरे, सालीक भगत, अशोक सुलाखे, कृष्णा कुराहे, प्रतिभा बन्सोड, ईश्वर मेश्राम, लोकचंद दमाहे, लोकेश पटले, सुपचंद पटले, डोमचंद बरैया, सुरेश नवगोडे यांचे सहकार्य लाभले.

Web Title: National Water Supply Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.