राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 10:57 PM2019-07-12T22:57:00+5:302019-07-12T22:57:26+5:30
तिरोडा ते तुमसर राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. हे काम संथ गतीने सुरू असल्याने तालुक्यातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदोरा : तिरोडा ते तुमसर राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. हे काम संथ गतीने सुरू असल्याने तालुक्यातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे. या मागणीला घेवून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुक्रवारी (दि.१२) दुपारी १२ वाजता बिरसी फाटा येथे माजी आ.दिलीप बन्सोड, राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन यांच्या नेतृत्त्वात रास्ता रोका आंदोलन करण्यात आले.
तिरोडा ते तुमसर राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे कंत्राटदाराच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मात्र कंत्राटदाराकडून रस्त्याचे काम फार संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना लांब अंतरावरुन जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे, यासाठी हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील रस्ते खराब असल्यामुळे बस सेवा बंद करण्यात आली आहे. परिणामी शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.त्यामुळे बंद केलेली बस सेवा त्वरीत पूर्ववत करण्यात यावी. शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून खरीप व रब्बी धानाचे सरसकट बोनस देण्यात यावे,शेतकऱ्यांना शेतीकरिता कृषी पंपासाठी वीज पुरवठा करण्यात यावा, प्रलंबित विद्युत जोडण्या देण्यात याव्या, तसेच शेतकऱ्यांना शेतीकरिता सोलर पंपाची अट रद्द करण्यात यावी. आदी मागण्यां सुध्दा आंदोलकांनी यावेळी लावून धरल्या.
या वेळी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने तहसीलदार, तिरोडा आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदारांनी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.या वेळी माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, राजलक्ष्मी तुरकर, तालुकाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, सभापती निता रहांगडाले, कैलास पटले, किशोर पारधी, मनोहर राऊत, वाय.टी. कटरे, सुनिता मडावी, उषा किंदरले, जया धावडे, प्रदीप मेश्राम, माया शरणागत, संध्या गजभिये, माया भगत,बबलदास रामटेके, रामकुमार असाटी, सुखराम उके, देवेंद्र मंडपे, नरेश जुनेवार व राष्टÑवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.