सर्वांगिण विकासासाठी राष्ट्रवादीच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 09:35 PM2018-08-12T21:35:16+5:302018-08-12T21:35:41+5:30

झाशीनगर उपसा सिंचन योजना रखडली, भेल कारखाना पुर्णत्वास येऊ शकला नाही. नक्षलग्रस्त जिल्ह्याचा बीआरजीएफ योडनेचा निधी बंद केला जात आहे. साडे पाच हजार कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन झाले. मात्र अद्यापही अंदाजपत्रक तयार झाले नाहीत. भाजप सरकारच्या कोणत्याच हेडमध्ये पैसे नाहीत. त्यामुळे हे सरकार केवळ थापा देणारे आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी शिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.

Nationalist option for overall development | सर्वांगिण विकासासाठी राष्ट्रवादीच पर्याय

सर्वांगिण विकासासाठी राष्ट्रवादीच पर्याय

Next
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : भरगच्च कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : झाशीनगर उपसा सिंचन योजना रखडली, भेल कारखाना पुर्णत्वास येऊ शकला नाही. नक्षलग्रस्त जिल्ह्याचा बीआरजीएफ योडनेचा निधी बंद केला जात आहे. साडे पाच हजार कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन झाले. मात्र अद्यापही अंदाजपत्रक तयार झाले नाहीत. भाजप सरकारच्या कोणत्याच हेडमध्ये पैसे नाहीत. त्यामुळे हे सरकार केवळ थापा देणारे आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी शिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (दि.११) आयोजीत भरगच्च कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार राजेंद्र जैन, पक्षाचे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, डॉ. अविनाश काशिवार, प्रदेश प्रतिनिधी डॉ. मनोहर चंद्रीकापुरे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विजय शिवनकर, जिल्हा परिषद सदस्य भास्कर आत्राम, रमेश ताराम, प्रभाकर दोनोडे, कैलाश डोंगरे, शब्बीरभाई, राकेश लंजे आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार पटेल यांनी, स्व.मनोहरभाई पटेल व माजी आमदार स्व.आडकुजी पाऊलझगडे यांनी या जिल्ह्याच्या विकासाची कास धरली होती. इटियाडोह धरण बांधून शेतकऱ्यांत हरितक्रांती आणली. १९५८ मध्ये गोंदिया एज्यूकेशन संस्थेची स्थापना करून जिल्ह्यात शैक्षणिक मुहूर्तमेढ रोवली. गोंदिया-भंडारा जिल्ह्याला सक्षम करावयाचे आहे. ही धुरा पेलण्यासाठी राष्ट्रवादीचे हात मजबूत करा. जिल्ह्याला सक्षम नेतृत्व नाही. लोकांच्या समस्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. धान उत्पादक शेतकºयांच्या मालाला भाव नाही. कर्जमाफीचे ढोंग केले. कर्जमाफी द्यायची होती तर सरसकट द्यायला पाहिजे होती. त्यात आॅनलाईनचे सोंग कशाला. बीआरजीएफचा निधी बंद करून या नक्षलग्रस्त जिल्ह्याचे ५० कोटींचे नुकसान केले. एकीक डे हे सरकार हे देणार- ते देणार अशी मुक्ताफळे उधळते. तर दुसरीकडे या शासनाच्या कोणत्याच हेडमध्ये निधी नाही. भंडारा जिल्ह्यातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांना तीन लाख २७ हजार रूपयांच्या औषधांचा पुरवठा केला गेला. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वाट्याला किती आले. यावरून या सरकारची जनतेच्या आरोग्याप्रती आस्था किती आहे दिसून येते असे बोलून दाखविले. सुशिक्षीत बेरोजगारांच्या रोजगाराचा प्रश्न आवासून उभा आहे. पकोडे विकणाºयालाही मोदी सरकार रोजगार म्हणतात. एवढे हे खोटारडे सरकर असल्याची आगपाखड खासदार पटेल यांनी भाषणातून केली. यावेळी खासदार कुकडे, पंचम बिसेन, शब्बीरभाई, विजय शिवनकर, यशवंत परशुरामकर, मनोहर चंद्रीकापुरे, किशोर तरोणे, सुशीला हलमारे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्तावीक लोकपाल गहाणे यांनी मांडले. संचालन जे.के.काळसर्पे यांनी केले. अभार सुधीर साधवानी यांनी मानले.
मेळाव्यासाठी नाजुका कुंभरे, भोजराम रहेले, बंडू भेंडारकर, नामदेव डोंगरवार, चित्रलेखा मिश्रा, योगेश नाकाडे, उद्धव मेहेंदळे, मनोहर शहारे, शालीक हातझाडे, राकेश जायस्वाल, माधुरी पिंपळकर, नितीन धोटे, तेजराम राऊत, विकास रामटेके, अजय पाऊलझगडे, नंदू चांदेवार, यशवंत गणवीर, सोनदास गणवीर, आर.के.जांभुळकर, जागेश्वर मडावी, कोमल जांभुळकर, रतिराम राणे, हिरालाल शेंडे, त्र्यंबक झोडे व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
लोकांच्या सुख-दुखात सहभागी व्हा
मेळाव्यात कार्यकर्त्यांना आवाहन करताना खासदार पटेल यांनी, लोकांची अनेक सुख-दुख आहेत. त्यांना सहकार्य करा. त्यांच्या पाठीशी उभे राहाल तरच पक्ष वाढेल. आता थांबू नका. पक्षाची बांधणी करून कामाला लागा असा सल्ला दिला. तर खासदार कुकडे यांच्याकडूनही त्यांनी जनतेच्या समस्यांच्या निकारणाची अपेक्षा व्यक्त केली.

Web Title: Nationalist option for overall development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.