नैसर्गिक शेती काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 09:10 PM2019-03-03T21:10:33+5:302019-03-03T21:11:04+5:30
रासायनिक खते व किटकनाशकांच्या उपयोगामुळे मानवाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. अशी घातक रसायने फळे, भाजीपाला आणि अन्नधान्यावर फवारल्यामुळे गेल्यादहा महिन्यांत केवळ विदर्भात २७२ व्यक्ती मृत्यूच्या दाढेत पोहोचले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रासायनिक खते व किटकनाशकांच्या उपयोगामुळे मानवाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. अशी घातक रसायने फळे, भाजीपाला आणि अन्नधान्यावर फवारल्यामुळे गेल्यादहा महिन्यांत केवळ विदर्भात २७२ व्यक्ती मृत्यूच्या दाढेत पोहोचले. एवढेच नव्हे तर अशी घातक रसायने पाण्याच्या साठ्यात पोहोचतात आणि असे पाणी प्यालाने रक्तदाब, आॅक्सीजनची कमतरता आणि पोटाच्या कर्करोग असे आजार उद्भवतात. शिवाय पृथ्वीचे अतोनात नुकसान होत असून नैसर्गिक शेती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन रसायनशास्त्र विभाग प्रमुख संध्या मून यांनी केले.
येथील एस.एस. गर्ल्स कॉलेजमध्ये २२ फेब्रुवारी रोजी आयोजीत रसायन विरहित, नैसर्गिक शेती आणि बागायती शेती आजच्या काळाची गरज या विषयावर आधारीत कार्यक्रमात त्या बोलत होत्या. उद्घाटन प्राचार्य एन.के. बहेकार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. ललीता रायचौधरी, डॉ. माधुरी नासरे, डॉ. रेखा लिल्हारे, राजश्री वाघ प्रामुख्याने उपस्थित होते. प्राचार्य डॉ. बहेकार यांनी, कृषी प्रधान भारताला कसे रसायनमुक्त करु शकतो यावर प्रकाश टाकला. उपस्थित अन्य पाहुण्यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमात विविध प्रकारचे स्टॉल्स लावले गेले होते. त्यात नैसर्गिक खते, कीटकनाशके, जैविक हारमोन्स, बुस्टर, वेगवेगळ्या प्रकारची झाडे आणि वनस्पती, मिनीडोअर गार्डन इत्यादींचे प्रदर्शन केले गेले. कार्यक्रमाला विद्यार्थिनींचा भरघोष प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमासाठी बी.एस.सी. द्वितीय वर्गाच्या सर्व विद्यार्थिनींनी सहकार्य केले.