निसर्ग कोपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 09:42 PM2018-02-14T21:42:37+5:302018-02-14T21:43:05+5:30
दोन दिवसांपूर्वी शेतात उभी असलेली टवटवीत पिके पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान होते;
ठळक मुद्देबळीराजा हताश : रब्बी पिकांसह अनेकांच्या घरांचेही नुकसान
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : दोन दिवसांपूर्वी शेतात उभी असलेली टवटवीत पिके पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान होते; मात्र आनंद आणि अपेक्षेवर मंगळवारी (दि.१३) रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीने विरजन घातले. शेकडो हेक्टरमधील उभी पिके भुर्ईसपाट झाल्याने निर्सग पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर कोपल्याची स्थिती निर्माण झाली. वादळी पाऊस व गारपिटीमुळे शेकडो घरांची पडझड झाल्याने अनेक कुटुंबांना रात्र जागून काढावी लागली. अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळून पडल्याने गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यातील काही गावांचा विद्युतपुरवठा मंगळवारी रात्रीपासून खंडित झाला आहे.