नवाटोलाची राज्यस्तरीय समितीकडून पाहणी

By admin | Published: May 13, 2017 01:37 AM2017-05-13T01:37:15+5:302017-05-13T01:37:15+5:30

सन २०१५-१६ मध्ये वनग्राम योजनेचा जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार पटकाविणाऱ्या नवाटोलाचे राज्यस्तरीय स्पर्धेत नाव नोंदविण्यात आले आहे.

Navatola inspected by state-level committee | नवाटोलाची राज्यस्तरीय समितीकडून पाहणी

नवाटोलाची राज्यस्तरीय समितीकडून पाहणी

Next

संत तुकाराम वनग्राम योजना : विविध कामांची केली पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : सन २०१५-१६ मध्ये वनग्राम योजनेचा जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार पटकाविणाऱ्या नवाटोलाचे राज्यस्तरीय स्पर्धेत नाव नोंदविण्यात आले आहे. नुकतेच राज्यस्तरीय पथकाने गावाला भेट देऊन संयुक्त वन व्यवस्थापन समितीने केलेल्या कामांची पाहणी केली.
नवाटोला येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीने वनांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी नावीन्यपूर्ण प्रयोग केलेले आहेत. त्या उपक्रम व धाडसी कार्यांची माहिती संकलीत करून तपासणी पथकासमोर सादर केली. समितीच्या कामामुळे नवाटोला, सोनारटोल, धनेगाव, कोसमतर्रा परिसरातील अनेक बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळाले आहे. समितीच्या अथक परिश्रमामुळेच हाजराफॉल सारखे नैसर्गिक पर्यटन स्थळ रोजगाराभिमुख बनले आहे. या व्यतिरीक्त वनोपजातून सुद्ध रोजगार व उत्पन्न प्राप्त करण्याची संधी स्थानिका लोकांना मिळाली आहे.
राज्यस्तरीय पथकाने पाहणी करताना निवडीचे काही निकष ठेवले व त्यात वनीकरण, मृदा व जलसंधारण, श्रमदान, वनोत्तर पर्ययी इंधनाचा वापर, वनसरंक्षण, वन्यप्राणी, पक्षी यांच्यासाठी पाणवठे तयार करणे, उपक्रमामध्ये स्त्रीयांचा सहभाग, आग प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती रॅली, निबंध व चित्रकला स्पर्धा इत्यादी माध्यमातून केलेली जनजागृती या बाबींच समावेश होता. निकषानुसार पाहणी करताना समितीची कामे प्रशंसनीय दिसून आली.
पथकामध्ये नागपूर येथील वन संरक्षक गिरीपूंजे, सामाजीक वनिकरणचे विभागीय वनाधिकारी ढेरे, सहायक वन संरक्षक तारसेकर व अन्य सदस्य होते. याप्रसंगी सरपंच पूजा वरकडे, जिल्ह्याचे सहायक वन संरक्षक यू.टी.बिसेन, वन परिक्षेत्राधिकारी सदानंद अवगान, क्षेत्र सहायक सी.जी.मडावी, वन रक्षक सुरेश रहांगडाले, संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदीन उईके तसेच समितीचे सदस्य व गावातील महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या. यावेळी उप वनसंरक्षक एस.युवराज यांनी मार्गदर्शन केले. तर सोनारटोला येथील समाजभवनात तपासणी, स्वागत सोहळा व मार्गदर्शन कार्यक्रमानंतर पथकाने वन क्षेत्रात जाऊन जंगलांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच समितीच्या उपक्रमांचीही तपासणी करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या
हस्ते पुरस्कृत
नवाटोला येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीला वन संवर्धन व वनांचे रक्षण करण्यासाठी सन २०१५-१६ चा वनग्राम योजनेचा जिल्हास्तरावरील प्रथम पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार स्वरूपात ५१ हजार रूपये, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते देण्यात आला होता.

 

Web Title: Navatola inspected by state-level committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.