नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 05:00 AM2020-09-30T05:00:00+5:302020-09-30T05:00:25+5:30

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या वाहनाच्या एकूण पर्यटक क्षमतेच्या ५० टक्के पर्यटकांनाच वाहनात प्रवेश दिला जाणार आहे. पुढील आदेशापर्यंत १० वर्षांपेक्षा कमी व ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना पर्यटनाकरीता प्रवेश देण्यात येणार नाही. पर्यटनाकरीता पुढील आदेशापर्यंत खाजगी वाहनांचा वापर करता येणार नाही.

Navegaon-Nagzira tiger project to be opened | नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प उघडणार

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प उघडणार

googlenewsNext
ठळक मुद्दे५० टक्के पर्यटकांनाच प्रवेश : बाल व वृद्धांना प्रवेश नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्क
्नेगोंदिया : कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता ३० जून पर्यंत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातीलपर्यटन बंद करण्यात आले होते. तसेच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातीलपर्यटनायोग्य रस्ते विचारात घेता पुढील अटी व शर्तीच्या अधिन राहून १ नोव्हेंबर पासून पर्यटन सुरु करण्यात येत आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या वाहनाच्या एकूण पर्यटक क्षमतेच्या ५० टक्के पर्यटकांनाच वाहनात प्रवेश दिला जाणार आहे. पुढील आदेशापर्यंत १० वर्षांपेक्षा कमी व ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना पर्यटनाकरीता प्रवेश देण्यात येणार नाही.
पर्यटनाकरीता पुढील आदेशापर्यंत खाजगी वाहनांचा वापर करता येणार नाही. व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी येणाऱ्या सर्वांसाठी या व्याघ्र प्रकल्पाचे राज्य शासन, केंद्र शासन व स्थानिक प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे सुरु करण्यात येणारे पर्यटन हे केवळ स्थानिक परिस्थिती योग्य असेल तेव्हाच चालू राहील. अती पाऊस वा व्यवस्थापन विषयक इतर कामांसाठी हे मार्ग बंद करण्याचे तसेच कोरोना संसगार्मुळे स्थानिक स्तरावर काही गंभीर परिस्थिती उद्भवल्यास प्रवेश बंद ठेवण्याचे अधिकार वन्यजीव विभागाकडे राखून ठेवले आहे.
आॅनलाईन बुकींगनंतर पर्यटन प्रवेशद्वारावर उपलब्धतेनुसार पर्यटकांना आॅफलाईन प्रवेश देण्यात येईल. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाचे आॅनलाईन सफारी आरक्षण व निवास व्यवस्था संकेतस्थळावरुन १ आॅक्टोबर पासून उपलब्ध होणार असल्याचे नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक आर.एम.रामानुजम यांनी कळविले आहे.

या नियमांचे पालन बंधनकारक
सर्व पर्यटक, गाईड, वाहनचालकांना मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्कशिवाय प्रवेशद्वारावरुन प्रवेश दिला जाणार नाही. तसेच पर्यटक वाहनात बसण्यापुर्वी सर्वांना सॅनिटायझरने हात निजंर्तुक करणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत वापरलेले मास्क, हातमोजे, पाण्याच्या बाटल्या इत्यादी साहित्य वनक्षेत्रात अथवा अन्यत्र फेकले जाणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे. प्रवेशद्वाराजवळ फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक राहील.

Web Title: Navegaon-Nagzira tiger project to be opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.