नवेगावबांध पर्यटनस्थळाला गतवैभव प्राप्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 10:14 PM2019-06-03T22:14:48+5:302019-06-03T22:15:04+5:30

नवेगावबांध पर्यटन स्थळ सन १९८० ते ९५ च्या मध्यकाळात सर्वदूर परिचित होते. मात्र या पर्यटन स्थळाचे गतवैभव टिकविता आले नाही. नवेगावबांध पर्यटनस्थळ चार विभागात विभागले असल्याने विकास कामे करण्यास अडचणी निर्माण होतात. मात्र या स्थळाच्या विकास कामाच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने या स्थळाचे गतवैभव प्राप्त होण्यासाठी वेळ लागणार नाही. येथील विकास कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

Navegaonwand tourism site will get great pleasure | नवेगावबांध पर्यटनस्थळाला गतवैभव प्राप्त होणार

नवेगावबांध पर्यटनस्थळाला गतवैभव प्राप्त होणार

Next
ठळक मुद्देराजकुमार बडोले : हिलटॉप गार्डन बांधकामाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : नवेगावबांध पर्यटन स्थळ सन १९८० ते ९५ च्या मध्यकाळात सर्वदूर परिचित होते. मात्र या पर्यटन स्थळाचे गतवैभव टिकविता आले नाही. नवेगावबांध पर्यटनस्थळ चार विभागात विभागले असल्याने विकास कामे करण्यास अडचणी निर्माण होतात. मात्र या स्थळाच्या विकास कामाच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने या स्थळाचे गतवैभव प्राप्त होण्यासाठी वेळ लागणार नाही. येथील विकास कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
येथील पर्यटन संकुल परिसरातील हिलटाप गार्डनच्या नवीन बांधकामाचे भूमिपूजन शनिवारी करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे होत्या. या वेळी प्रामुख्याने पं.स.सदस्य होमराज पातोडे, सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, माजी जि.प.सदस्य विजया कापगते, कृउबास संचालक केवळराम पुस्तोडे, चामेश्वर गहाणे, वन व्यवस्थापन समितीचे रामदास बोरकर, खंडविकास अधिकारी आबीलकर, वन्यजीव उपविभागीय अधिकारी पाटील, स्वागत अधिकारी अवधान, नवेगावबांध वनपरिक्षेत्राधिकारी दोनाडे उपस्थित होते.
बडोले म्हणाले, मागील ९ ते १० वर्षापासून या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करीत असताना नवेगावबांध पर्यटन संकूल परिसराला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत या क्षेत्रात बरीच विकास कामे झाली आहेत. १३ कोटी रुपयांच्या निधीतून महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने विश्रामगृह बांधकाम करण्यात येत आहे. नौका विहार, बालोद्यान, साहसी खेळ,जलाशय काठावरील बीच, नवेगावबांध ते संकुल परिसर मुख्य मार्गाला रस्ता बांधकाम पूर्ण झालेले आहे. तर काही कामे प्रगती पथावर आहेत.
नवेगावबांध पर्यटन संकुलाकरिता ५५ लाख रुपयांच्या निधीतून प्रवेशध्दार, ३.५० कोटीचे मिनी ट्रेन, १ कोटीचे इंटरप्रिटेशन हॉल, १५ कोटीचे वाटरपार्क व अन्य विविध कामे प्रस्तावित आहेत. लवकरच या कामांना सुध्दा मंजुरी मिळेल. जोपर्यंत या पर्यटन स्थळाचा विकास होणार नाही तोपर्यंत पर्यटक येणार नाही. पर्यटक येईल तेव्हाच रोजगार उपलब्ध होतील. तेव्हाच या परिसराचा खºया अर्थाने विकास होईल असे बडोले म्हणाले. नवेगाव पर्यटन स्थळाच्या चार विभागाला एकत्रित आणून विकास करण्यात यावा. या संदर्भात लवकरच मंत्रालयात बैठक घेवून त्यावर अंतीम निर्णय घेण्यात येईल.
संपूर्ण पर्यटन संकुल परिसर विकासासाठी एकाच विभागाकडे हस्तांतर करुन स्थानिक वन व्यवस्थापन समितीला देण्याचा आमचा मानस असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प. बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी ताकसांडे यांनी केले तर संचालन व आभार परशुरामकर यांनी मानले.

Web Title: Navegaonwand tourism site will get great pleasure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.