नवेगावबांध-नागझिरा प्रकल्प व्याघ्र राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 02:36 PM2019-08-01T14:36:59+5:302019-08-01T14:39:25+5:30

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात प्रभावीपणे उपाय योजना राबवून योग्य व्यवस्थापन करण्यात या प्रकल्पाला ७८.९१ टक्के रेटिंग मिळाली असून राज्यात अव्वल स्थान पटकाविले आहे.तर देशात १२ वे स्थान प्राप्त केले आहे.

Navegwabandh-Nagzira project tops in state | नवेगावबांध-नागझिरा प्रकल्प व्याघ्र राज्यात अव्वल

नवेगावबांध-नागझिरा प्रकल्प व्याघ्र राज्यात अव्वल

Next
ठळक मुद्देदेशात १२ व्या स्थानी प्रभावी उपाययोजनांची दखल

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात प्रभावीपणे उपाय योजना राबवून योग्य व्यवस्थापन करण्यात या प्रकल्पाला ७८.९१ टक्के रेटिंग मिळाली असून राज्यात अव्वल स्थान पटकाविले आहे.तर देशात १२ वे स्थान प्राप्त केले आहे.
राज्यात ६ तर देशात एकूण ५० व्याघ्र प्रकल्प आहेत.या प्रकल्पाचे दरवर्षी केंद्र सरकारकडून रेटींग केले जाते. नवेगावबांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पाने योग्य व्यवस्थापन आणि प्रभावीपणे उपाययोजना करुन देशात प्रसिध्द असलेल्या जिम कार्बेट, मेळघाट, ताडोबा, पेंच मुदुमलाई, सुंदरवन, बांधवगड, रणथंभोर या प्रकल्पाने मागे टाकले आहे. २९ जुलैला जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्वी दिल्ली येथे आयोजित चौथ्या अखिल भारतीय व्याघ्र गणना व चौथ्या व्यवस्थापन मुल्याकंन अहवाल जाहीर केला.यात नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात महाराष्ट्रातून अव्वल तर देशातून १२ वे स्थान प्राप्त झाले. या वेळी नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मनिकंड रामानुज उपस्थित होते. देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पात राबविण्यात येणाऱ्या विविध उपाय योजना आणि व्यवस्थापनाचे केंद्र सरकारकडून चार वर्षांत मुल्याकंन केले जाते.३२ विषय आणि क्षेत्रीय भेटी आणि प्रकल्पातील कर्मचाऱ्यांशी चर्चा आणि कार्यालयीन कागदपत्रांची तपासणी करुन हा अहवाल तयार केला जातो.यासाठी एक समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती वन्यजीव व्यवस्थापन,अधिवास विकास, वन्यजीव सुरक्षा,लोकसहभागातून विकास कार्य,जनजागृती, निसर्ग पर्यटन व्यवस्थापन आदी विषयांचे निरीक्षण करुन मुल्याकंन केले जाते.केंद्र सरकारने १९७३ मध्ये देशात वाघांची संख्या वाढविण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी या प्रकल्पाची सुरूवात करण्यात आली. त्यावेळी केवळ देशात ९ व्याघ्र प्रकल्प अस्तीत्त्वात होते.आता ही संख्या ५० वर पोहचली आहे. नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्प २०१३ अस्तीत्त्वात आला. हा राज्यातील ४६ वा व्याघ्र प्रकल्प होता. महाराष्ट्रातील एकूण सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प असून दरवर्षी देश विदेशातील हजारो पर्यटक येथे भेट देत असून यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होत आहे.

नवेगावबांध-नागझिरा प्रकल्पातील महत्त्वपूर्ण कामे
नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रात येणाऱ्या पाच गावांचे पुनर्वसन करण्यात आले. बफर झोन क्षेत्रातील १४० गावांमध्ये डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतंर्गत मागील चार वर्षात २६ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान प्राप्त करुन देण्यात आले.व्याघ्र प्रकल्पाच्या सुरक्षेकरिता ११२ जवान आणि अधिकाऱ्यांचा विशेष व्याघ्र सुरक्षा दल स्थापन करण्यात आला आहे. वन्यजीवांसाठी १३०० हेक्टरवर तन निमूर्लन, २ हजार हेक्टरवर चारा विकास प्रकल्प, ११२ कृत्रिम पाण्याचे स्त्रोत आणि त्यावर सोलर पंपाची व्यवस्था आणि ६५ शिकार विरोधी सुरक्षा कुटी तयार करण्यात आल्या आहेत हे विशेष.

नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला राज्यात अव्वल तर देशात १२ स्थान प्राप्त होणे ही जिल्हावासीयांसाठी अभिमानाची बाब आहे.या प्रकल्पाचे योग्य व्यवस्थापन करण्यात वन्यजीव विभागात कार्यरत प्रत्येकाचे महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांच्याच मेहनतीचे हे फलित आहे.
- मनिकंड रामानुज,
वनसंरक्षक वन्यजीव विभाग गोंदिया.

Web Title: Navegwabandh-Nagzira project tops in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.