नवतपाला पावसाचा थंडावा

By Admin | Published: May 31, 2017 01:05 AM2017-05-31T01:05:41+5:302017-05-31T01:05:41+5:30

नवतपा म्हणताच अंगाला घाम फुटू लागतो व जीवाला धसका बसतो. मात्र यंदाच्या नवतपाला पावसाचा थंडावा मिळाल्याने

Nawantpala rain chill | नवतपाला पावसाचा थंडावा

नवतपाला पावसाचा थंडावा

googlenewsNext

 पाहिजे तसा तापलाच नाही : पावसाने पारा घसरला
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नवतपा म्हणताच अंगाला घाम फुटू लागतो व जीवाला धसका बसतो. मात्र यंदाच्या नवतपाला पावसाचा थंडावा मिळाल्याने नवतपा पाहिजे तसा तापलाच नाही. विशेष म्हणजे मे महिन्यातील उन्हापेक्षा कमी तापमानाची नोंद नवतपात घेण्यात आली आहे.
निसर्गाने उन्हाळा, हिवाळा व पावसाळा असे तीन ऋतूंचे चक्र बांधून दिले आहे. मात्र मानवाच्या स्वार्थीपणामुळे झाडांचे जंगल नष्ट होऊन सिमेंट कॉंक्रीटचे जंगल वाढू लागले आहे. याचा परिणाम ऋतूचक्रावर झाला असून पर्यावरण प्रदूषीत झाले आहे. उन्हाची दाहकता वाढत चालली असून पावसाळ््यात पाहिजे तसा पाऊस पडत नाही. निसर्गाशी छेडखानीचे हे परिणाम आता आपल्या समोर येवू लागले आहेत. हेच कारण आहे की पूर्वी ४० डिग्रीच्या वर न जाणारे तापमान आता ४५ च्यावर जाऊ लागले आहे.
त्यात नवतपा म्हटला म्हणजे रविराज पृथ्वीच्या जवळ येऊन आग ओकू लागल्याचा काळच म्हटला जातो. अवघ्या उन्हाळ््यातील उन्ह या नऊ दिवसांत पडत असल्याचेही नवतपा बाबत बोलले जाते. यामुळेच नवतपा म्हटला की सूर्य सर्व काही भाजून काढणार एवढ्या तापमानाची कल्पना केली जाते. नवतपाच्या या नऊ दिवसांत सूर्य खरोखरच आग ओकून आपली ताकत दाखवून देतात.
यंदा मात्र २५ मे पासून सुरू झालेल्या नवतपाला पावसाने आपला थंडावा दिल्याने नवतपा पाहिजे तसा तापला नाही. कारण यंदा नवतपाच्या काळात बहुतांश दिनी वरूणराजाने आपली हजेरी लावून तापमान नियंत्रणात आणले. विशेष म्हणजे नवतपाच्या पूर्वीच्या दिवसांत पारा जास्त चढलेला होता. मात्र नवताप सुरू झाल्यानंतर ढगाळ वातावरणाने पारा उतरल्याचे दिसले.
रविवारपासून तर दररोज पाऊस बरसत आहे. विशेष म्हणजे नवतपाच्या पूर्वीच्या काळात यापेक्षा जास्त नोंद घेण्यात आली असल्याने यंदाच्या नवतपावर पावसाने पाणी फेरल्याचे दिसले.

रविवारच्या पावसाने वातावरण कुल-कुल
नवतपाच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी ढगाळ वातावरणामुळे पारा उतरला होता. तर चवथ्या दिवशी रविवारी (दि.२८) पावसाने दमदार एंट्री मारली. रविवारच्या पावसाने जणू पावसाळाच सुरू झाल्याचे चित्र तयार झाले होते. पावसामुळे वातारणात गारवा निर्माण झाला व लोकांची उकाड्यापासून सुटका झाली. एकंदर रविवारच्या पावसाने वातावरण कुल-कुल झाले. सोमवारीही सकाळी ढगाळ वातावरण होते व थंड वारा वाहत होता. त्यामुळे लोकांना उन्हापासून दिलासा मिळाला.
दररोजच पावसाची हजेरी
रविवारी हजेरी लावल्यानंतर आता दिवसा उन्ह व सायंकाळी मात्र अचानक वादळीवाऱ्यासह पाऊस बरसण्याचे सत्रच सुरू झाले आहे. या पावसाने मात्र नवतपालाच फेल केले आहे. दररोज पाऊस बरसत असल्याने तापमानाच चांगलीच घट झाली असून उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दररोजच पाऊस आपली हजेरी लावून सर्वांनाचा सुखावत आहे. पावसाच्या या आगमनामुळे सर्वांना दिलासा मिळाला असून दररोज असाच पाऊस बरसावा अशी सर्वांची इच्छा आहे.

Web Title: Nawantpala rain chill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.