‘नवतपा’ जिल्ह्याला तापवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 09:45 PM2018-05-21T21:45:54+5:302018-05-21T21:45:54+5:30

उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला आहे. रविराज आता चांगलेच तापू लागले आहे. अंगाची लाही-लाही होत आहे. त्यात येत्या २५ तारखेपासून नवतपाला सुरूवात होत असल्याने भल्याभल्यांना नाव ऐकताच धडकी भरली आहे.

The 'Nawatpa' district will make the heat | ‘नवतपा’ जिल्ह्याला तापवणार

‘नवतपा’ जिल्ह्याला तापवणार

Next
ठळक मुद्देपारा ४३ डिग्रीवर : २५ पासून होणार सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला आहे. रविराज आता चांगलेच तापू लागले आहे. अंगाची लाही-लाही होत आहे. त्यात येत्या २५ तारखेपासून नवतपाला सुरूवात होत असल्याने भल्याभल्यांना नाव ऐकताच धडकी भरली आहे. आताच पारा ४३ डिग्रीवर गेला असताना नवतपात काय होणार याची कल्पना करूनच घाम फुटत आहे.
उन्हाळ््याच्या अवघ्या चार महिन्यांतील सर्वाधिक तापमान नऊ दिवसांत असते. असे म्हटले जाते व त्यालाच ‘नवतपा’ म्हणता. नवतापमध्ये रोहिणी नक्षत्र लागत असून सूर्य आग ओकत असल्याने हे नऊ दिवस चांगलेच तापतात. एक प्रकारे सुर्यदेव पृथ्वीच्या अगदी जवळ आल्याचे वाटू लागते. यंदा येत्या २५ तारखेपासून ३ जूनपर्यंत नवतपा लागत आहे.
त्यामुळे २५ तारखेपासूनचे नऊ दिवस कसे असणार याची कल्पना करताच अंगाची लाही लाही होत आहे. यंदाचा उन्हाळा अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणात कसा तरी निघून गेला. मात्र आता मागील काही चार-पास दिवसांपासून उन्हाळयाचे चटके चाखायला मिळत आहे. रविवारी पारा ४४ डिग्रीवर पोहचल्याचे दिसले. यंदाचे हे कमाल तापमान असून उन्हाची ही सरशी बघता घरातून बाहेर निघणे कठिण झाले आहे. उन्ह वाढतच चालल्याने गरम हवेच्या लाटा वाहत असून अंगाची लाही-लाही होत आहे.

एसी व कुलर झाले फेल
उन्हाळ््यापासून मुक्ती मिळावी यासाठी एसी व कुलरचा सहारा घेतला जात आहे. मात्र उष्णता एवढी आहे की त्यापुढे एसी व कुलरसुद्धा काम करीत नाही. उष्ण हवेच्या लाटांमुळे एसी व कुलरची हवा उष्ण होत आहे. मात्र काही केल्या गरमीपासून मुक्तता मिळणे कठिण झाले आहे. तर घरांवर असलेल्या पाण्याच्या टाक्यांतूनही अंगाला भाजून टाकणार एवढे गरम पाणी येत आहे. त्यामुळे दिवसभराच्या उष्णता व घाम यामुळे चिपचिप झालेल्या अंगाला धूवून काढण्यासाठी सायंकाळची आंघोळही कठिण झाली आहे.
जिल्ह्याची यंत्रणा माहिती देण्यात अपयशी
जिल्ह्यातील दररोजच्या तापमानाची नोंद तसेच मागील वर्षांतील तापमानाबद्दल माहिती पुरविण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा अपयशी ठरत आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात असलेले नियंत्रण कक्ष फक्त नावापुरतेच आहे. तहसील कार्यालयाकडून पूर्वी असलेली व्यवस्थाही आता बंद पडून आहे. यावरून येथील यंत्रणा किती तत्परतेने कार्य करीत आहे हे दिसून येते.

Web Title: The 'Nawatpa' district will make the heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.