नक्षल समर्थक इसमाच्या शेतात आढळले ५२ राऊंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:32 AM2021-08-22T04:32:08+5:302021-08-22T04:32:08+5:30
गोंदिया : बालाघाट पोलिसांनी ७ जुलै रोजी अटक केलेल्या आठ जणांपैकी एक आरोपी घनश्याम शिवलाल आचले (३४), रा. ...
गोंदिया : बालाघाट पोलिसांनी ७ जुलै रोजी अटक केलेल्या आठ जणांपैकी एक आरोपी घनश्याम शिवलाल आचले (३४), रा. परसोडी, पो. फुटाणा, ता. देवरी (गोंदिया) याच्या शेतात असलेल्या झोपडीतून एके-४७ बंदुकीचे ५२ राऊंड १९ ऑगस्ट रोजी जप्त करण्यात आले. ही कारवाई गोंदिया पोलिसांनी केली आहे.
मध्य प्रदेशच्या किरनापूर किन्ही जंगलात नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवठा करण्यासाठी फिरत असलेल्या आठ जणांना बालाघाट पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याजवळून तीन पिस्तूल, तीन मॅक्झिन, एके फोर्टी सेव्हन, आठ मोबाइल, चारचाकी दोन वाहने, एलईडी, टॉर्च, हवा पंप, एमपीथ्री प्लेयर, पर्स, सुटकेस, तीन बॅग सामान जप्त करण्यात आले होते. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील परसोडी येथील घनश्याम आचले याच्या शेतातील झोपडीत एके-४७ या बंदुकीचे ५२ राऊंड गोंदिया पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी ३,२५,२६ भारतीय हत्यार कायदा सहकलम १८, २०,२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात सी-६० पथक, चिचगड पोलिसांनी केली आहे. यासंदर्भात चिचगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिली आहे.