गोंदियात नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला; १० किलो स्फोटके जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 02:18 AM2019-06-03T02:18:07+5:302019-06-03T02:18:13+5:30
गोंदिया : जिल्ह्यात घातपाताचे नक्षल्यांचे मनसुबे जिल्हा पोलिसांनी उधळून लावले. नक्षलवाद्यांनी सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत टेकाटोला ते मुरकुटडोह-३ दरम्यान पुलाखाली ...
गोंदिया : जिल्ह्यात घातपाताचे नक्षल्यांचे मनसुबे जिल्हा पोलिसांनी उधळून लावले. नक्षलवाद्यांनी सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत टेकाटोला ते मुरकुटडोह-३ दरम्यान पुलाखाली लावलेली स्फोटके पोलिसांनी जप्त केली आहे.
शनिवारी दुपारी गुप्त माहिती मिळाल्यानंतर या परिसरात सर्च आॅपरेशन राबविले. अधिकाऱ्यांनी सी-६० पथक व बॉम्ब शोधक-नाशक पथकाला घेऊन शोधमोहीम राबविली. त्यांना टेकाटोला ते मुरकुटडोह-३ कडे जाणाºया रस्त्याच्या पुलाखाली एक जर्मनचा डबा व इलेक्ट्रिक वायर आढळून आले. या डब्यात खिळे व काचेचे तुकडे मिश्रीत १० किलो दाणेदार स्फोटक पदार्थ, जिलेटिन स्टीक, इलेक्ट्रिक डेटोनेटर तसेच काळ्या रंगाची १३५ फूट तर हिरव्या रंगाची १७५ फूट इलेक्ट्रिक वायर अशी स्फोट घडविण्यासाठी लागणारी सामुग्री होती. पोलिसांनी हे साहित्य ताब्यात घेतले आहे.
३० जणांवर गुन्हा
प्रतिबंधित माओवादी संघटनेचे सदस्य सी.सी.एम. मिलिंद उर्फ दिलीप तेलतुंबडे व त्यांच्या इतर २९ सदस्यांविरुद्ध सालेकसा येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.