नयना गुंडे गोंदियाच्या नव्या जिल्ह्याधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 05:00 AM2021-07-12T05:00:00+5:302021-07-12T05:00:10+5:30
जिल्हाधिकारी नयना गुंडे या सोमवारी (दि.१२) पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. गोंदियाचे तत्कालीन जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांची महिनाभरापूर्वी मुंबई मंत्रालयात बदली झाली होती. तेव्हापासून गोंदिया जिल्हाधिकारी पद रिक्त होते. जिल्हाधिकारीपदी कोण येतो याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. याला घेऊन काही नावेसुध्दा चर्चेत होती, तर शनिवारी सोशल मीडियावर नयना गुंडे यांची गोंदिया जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्याची चर्चा होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया जिल्हाधिकारीपदी यशदाच्या उपमहासंचालक नयना गुंडे यांची बदली करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. शनिवारी (दि.१०) रात्री यासंदर्भातील अधिकृत पत्र गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहे.
जिल्हाधिकारी नयना गुंडे या सोमवारी (दि.१२) पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. गोंदियाचे तत्कालीन जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांची महिनाभरापूर्वी मुंबई मंत्रालयात बदली झाली होती. तेव्हापासून गोंदिया जिल्हाधिकारी पद रिक्त होते.
जिल्हाधिकारीपदी कोण येतो याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. याला घेऊन काही नावेसुध्दा चर्चेत होती, तर शनिवारी सोशल मीडियावर नयना गुंडे यांची गोंदिया जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्याची चर्चा होती. मात्र यासंदर्भातील अधिकृत पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले नव्हते.
त्यामुळे याला अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाला यासंदर्भातील पत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी याला दुजोरा दिला. गोंदिया येथे महिला जिल्हाधिकारी म्हणून कादंबरी बलकवडे यांच्यानंतर रूजू होणाऱ्या नयना गुंडे या दुसऱ्या महिला जिल्हाधिकारी होत.