गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:19 AM2021-06-23T04:19:35+5:302021-06-23T04:19:35+5:30

गोंदिया : सर्वसामान्यांना लक्षात घेऊनच पक्ष संधी देते. पक्षाच्या माध्यमातून नेहमीच सर्वांची कामे करून विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. ...

NCP is committed for the development of Gondia district | गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध

गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध

Next

गोंदिया : सर्वसामान्यांना लक्षात घेऊनच पक्ष संधी देते. पक्षाच्या माध्यमातून नेहमीच सर्वांची कामे करून विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांसह राहून त्यांची कामे करून पक्षाला बळकट करावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोंदियाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन खा. प्रफुल्ल पटेल यांनी केले.

शहरातील सिव्हिल लाइन्स परिसरातील अहमद यांच्या निवासी त्यांनी भेट दिली व परिसरातील नागरिकांशी त्यांच्या समस्या व शहरातील विविध विषयांवर चर्चा करताना ते बोलत होते. याप्रसंगी जॅकी अग्रवाल, मसूद सय्यद, सायना शेख, मनोज बिसेन, सुनील चांदे, सुनील सेंगर, सुरेश रामटेककर, फिरोज खान, पराग तिवारी, नईम खान, मोईन खान, जावेद शेख, नफशिंग शेख, शेख निजाम, ताराचंद कापसे, विठ्ठल हरडे आदींनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमात माजी आ. राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, अशोक शहारे, विनोद हरिणखेडे, केतन तुरकर, रफिक खान, डॉ. शिबू आचार्य, डॉ. गाडेकर, जयंत कछवाह, हेमंत पंधरे, छोटू पंचबुद्धे, शंकर सहारे, संगीन अहमद, सय्यद अली, रियन शेख, रवींद अहमद, नानू मुदलियार, शरद गिजरे, बाबू सरदार, मोहन सिंग, नरेश हारोडे, बबलू मिशन, सोनू मिशन, राजू सिंग, सुरजित सिंग, महेश करियर, मौलाना राजा, देवेंद्रसिंग भाटिया, मौलाना सुमान, हरबक्ष गुरुनानी, कुंदा दोनोडे, हरजित सिंग जुनेजा, अल्ताफ शेख, अरविंद हारोडे, सुरजित गुलाटी, नईम सिद्दीकी, हारुण मिस्री, मालकसिंग बिसेन यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: NCP is committed for the development of Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.