राष्ट्रवादी काँग्रेस गोरगरिबांच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:37 AM2021-06-09T04:37:12+5:302021-06-09T04:37:12+5:30

अर्जुनी मोरगाव : गोंदिया-भंडारा जिल्ह्यांच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. लोकहितासाठी पक्ष सजग आहे. कोरोना महामारीमुळे अडचणी आल्या. शेतकरी, ...

NCP with the support of the poor | राष्ट्रवादी काँग्रेस गोरगरिबांच्या पाठीशी

राष्ट्रवादी काँग्रेस गोरगरिबांच्या पाठीशी

Next

अर्जुनी मोरगाव : गोंदिया-भंडारा जिल्ह्यांच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. लोकहितासाठी पक्ष सजग आहे. कोरोना महामारीमुळे अडचणी आल्या. शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांच्या प्रश्नांची आपल्याला जाण आहे. त्यासाठी आपण काम करीत आहोत. आम्ही राजकारण करीत नाही. मात्र कुणी विकासाच्या आड येत असेल तर त्याला धडा शिकवू असे प्रतिपादन खा प्रफुल्ल पटेल यांनी केले.

रविवारी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित कार्यकर्त्यांशी संवाद,शेतकऱ्यांची धानखरेदी, बोनस व कर्जमाफी तसेच तालुका राकाँ पक्षाची वाटचाल यावरील आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी आ.मनोहर चंद्रिकापुरे, तुमसरचे आ. राजू कारेमोरे, माजी आ. राजेंद्र जैन, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजय शिवणकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, सुनील फुंडे उपस्थित होते. खा. पटेल पुढे म्हणाले, देशात ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असतांना आपण दोन्ही जिल्ह्यात पुरवठा केला. कोरोनाचा एवढा उद्रेक होता की बेड आहे तर रेमडीसिविर व ऑक्सिजन नाही. कधी दोन्ही उपलब्ध आहेत तर बेड नाही अशी विचित्र परिस्थिती होती. या महामारीवर अजून तरी औषध नाही. लस घेतली तर थोडं संरक्षण होते. मात्र लस घेतली की कोरोना होणार नाही असा गैरसमज बाळगू नका. मास्क, सॅनिटायजर, सुरक्षित अंतर या नियमांचे पालन करा. स्वतःची व कुटुंबियांची काळजी घ्या. धानउत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ देणारे फक्त महाराष्ट्र राज्यच आहे. शेतकऱ्यांच्या बोनसचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. खरीपचा धान गोदामात पडून आहे. ते भरडाईसाठी पाठवून गोदाम रिकामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. धान खरेदी केंद्र सुरू होत आहेत. कोरोनाच्या परिस्थितीमुळे थोडा विलंब झाला मात्र शेतकऱ्यांचा धान घेतला जाईल. यावेळी लोकपाल गहाणे, किशोर तरोणे, यशवंत परशुरामकर, उद्धव मेहंदळे,राकेश लंजे, नामदेव डोंगरवार,बंडू भेंडारकर, सोनदास गणवीर,श्रीदान पालिवाल, सुशीला हलमारे,चित्रलेखा मिश्रा, आ. के. जांभुळकर, सुधीर साधवानी, यशवंत गणवीर, हिरालाल शेंडे,,योगेश नाकाडे, निप्पल बरेय्या, अनिल लाडे, योगीराज हलमारे, दीपक सोनवाने, मनोहर शहारे, देवानंद नंदेश्वर, शालिक हातझाडे, आनंदराव बाळबुद्धे, नरेश रंगारी, अजय पाऊलझगडे, अजय शहारे,पिंटू जिवाणी, योगेश कासार,विकास रामटेके व कार्यकर्ते उपस्थित होते. ....... वनहक्क पट्टयांचा प्रश्न मार्गी लावणार आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी शासनाने शेतकऱ्यांचे आधारभूत हमीभावाने धान खरेदी करण्याचे दृष्टीने शाळा, समाजमंदिरे, आश्रमशाळात साठवणूक करण्याचे पत्र काढले. वनहक्क जमिनीचे पट्टे लाभार्थ्यांना मिळावे हा आपला अग्रक्रमाचा काम असून हा प्रश्न लवकरच निकाली निघेल असे सांगितले.

Web Title: NCP with the support of the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.