दुष्काळ व बेरोजगारीवर राष्ट्रवादी होणार आक्रमक
By admin | Published: January 10, 2016 02:06 AM2016-01-10T02:06:45+5:302016-01-10T02:06:45+5:30
तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा येथील विंधेश्वरी राईस मिलमध्ये मंगळवारी (दि.५) पार पडली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसची सभा : पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती
देवरी : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा येथील विंधेश्वरी राईस मिलमध्ये मंगळवारी (दि.५) पार पडली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश जैन यांच्या अध्यक्षतेत आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रमेश ताराम यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत सभेला नगर पंचायत अध्यक्ष सुमन बिसेन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विजय कश्यप, राकाँचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाल तिवारी, वरिष्ठ कार्यकर्ता केशव भुते, तालुका राकाँ सेवादलचे अध्यक्ष छोटेलाल बिसेन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोपाल राऊत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या सभेत संघटनविषयक बाबींवर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे शेतकरी व दुष्काळ याशिवाय बेरोजगारांच्या विषयाला घेत त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रास्ताविक रमेश ताराम यांनी मांडले. संचालन नंदकिशोर बारसे यांनी केले. आभार नीलेश वालोदे यांनी मानले.
या सभेत राकाँच्या सर्व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार
या सभेत राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी नगराध्यक्ष सुमन बिसेन, गटनेता तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे सभापती अन्नु शेख, महिला व बालकल्याण सभापती माया निर्वाण, उपसभापती दविन्दरकौर भाटीया, नगरसेवक हेमलता कुंभरे, सीता रंगारी आणि नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक महेश जैन, किसान राईस मिल संस्थेचे अध्यक्ष रामचंद देसाई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश ताराम, उपसभापती विजय कश्यप आदींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पक्षाचा गमछा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
दुष्काळाला घेऊन
मोर्चाची तयारी
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व पिकांच्या नुकसानीने झालेले शेतकऱ्यांचे हाल बघता राष्ट्रवादी कॉंग्रेस गंभीर असून हा विषय हाताळण्यासाठी सभेत चर्चा करण्यात आली. एवढेच नव्हे तर या विषयांना घेऊन मोर्चा काढण्याचा पवित्रा दिसून येत असून त्यावर चर्चा करण्यात आली.