विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ७० ते ८० जागांची मागणी करणार: प्रफुल्ल पटेल

By अंकुश गुंडावार | Published: June 16, 2024 06:39 PM2024-06-16T18:39:18+5:302024-06-16T18:40:31+5:30

गोंदिया विधानसभेवरही दावा करणार

ncp will demand 70 to 80 seats for the legislative assembly said praful patel | विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ७० ते ८० जागांची मागणी करणार: प्रफुल्ल पटेल

विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ७० ते ८० जागांची मागणी करणार: प्रफुल्ल पटेल

गोंदिया : तीन महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ७० ते ८० जागा मागणार आहे. आमच्याकडे असलेल्या आमदारांच्या संख्येवरून हा दावा करणार असून यावरचा अंतिम निर्णय मात्र हा महायुतीच्या बैठकीत होईल. तसेच लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकासुद्धा महायुतीत लढणार असल्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी (दि.१६) गोंदिया येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी चुकीचा अपप्रचार केला. संविधानाच्या मुद्द्यावरून जनतेला भ्रमीत करण्याचे काम केले. याचाच फटका निवडणुकीत एनडीएला बसला. या निवडणुकीत नेमक्या काय चुका झाल्या त्याचा शोध घेऊन सुधारणा करणार असल्याचे खा. पटेल यांनी सांगितले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यमंत्रिपदाची ऑफर होती. पण आम्ही कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली आहे. यावर भाजपने विचार करू असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात कॅबिनेट मंत्रिपद येणे अटळ असून ते आपल्यालाच मिळणार असून याबाबत पक्षाचासुद्धा निर्णय झाला असल्याचे खा. पटेल यांनी सांगितले.

महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार

गेल्या अनेक दिवसांपासून महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार थांबलेला आहे. यावर खा. पटेल यांना विचारले असता लवकरच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार आणि जी पदे खाली आहेत त्या ठिकाणी विस्तार करून जी काही वाचलेले महिन्यात त्याच्यामध्ये चांगल्या जोमाने काम करता येणार असल्याचे सांगितले.

विधानसभेत वेगळे पिच्चर असणार

देशामध्ये नुकत्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीए सरकारला अपेक्षित यश आले नाही. महाराष्ट्रातदेखील परिस्थिती वेगळीच राहिली. मात्र आता आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत परिस्थिती काही वेगळी राहील. विधानसभा निवडणुकीमध्ये पिच्चर बदलेल असा दावा खा. पटेल यांनी केला.

एलन मस्क यांनी फुकटचा सल्ला देऊ नये

एलन मस्क यांनी ट्विट करत ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत ईव्हीएम बंद करायला पाहिजे असे वक्तव्य केले होते. यावर खा. प्रफुल्ल पटेल यांनी एलन मस्क यांनी फुकटचा सल्ला देऊ नये. त्यांनी तिथे बसून गाड्या बनवायला पाहिजे फुकटचा सल्ला देऊ नये असे खा. पटेल म्हणाले.

गोंदिया विधानसभेवर दावा करणार

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चारही मतदारसंघांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा राहील. गोंदिया विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न राहील. यावर महायुतीच्या बैठकीत कोणती जागा कोणी लढवावी याबाबतचा निर्णय होईल तेव्हा ठरवू असे खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

Web Title: ncp will demand 70 to 80 seats for the legislative assembly said praful patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.