राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:19 PM2017-11-27T23:19:06+5:302017-11-27T23:19:49+5:30

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करुन सोमवारी (दि.२७) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

NCP's attackball movement | राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन

राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन

Next
ठळक मुद्देविविध मागण्या : जिल्हाधिकाºयांना निवेदन

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करुन सोमवारी (दि.२७) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात विविध मागण्यांचा समावेश होता.
केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी राष्टÑवादी काँग्रेसतर्फे राज्यभर हल्लाबोल आंदोलन करण्यात येत आहे. याच अर्तर्गत सोमवारी गोंदिया येथे हे आंदोलन करण्यात आले. शेतकरी कर्जमाफी, महागाई, बेरोजगारी, वीज दरवाढ, पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ, ओबीसी शिष्यवृत्ती, रस्ते दुरूस्ती व विस्कळीत झालेली न्यायव्यवस्था, भाजप सरकारने दिलेले खोटे आश्वासन व या सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी हे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यापुढे १ ते ११ डिसेंबरपर्यंत यवतमाळ ते नागपूर १५३ किलोमीटरची हल्लाबोल पदयात्रा काढून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे, असे राष्ट्रवादी पक्षाने म्हटले आहे. जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यात जि.प.चे गटनेते गंगाधर परशुरामकर, जिल्हा उपाध्यक्ष शिव शर्मा, पंचम बिसेन, जि.प. सदस्य कुंदन कटारे, दुर्गा तिराले, सुमन बिसेन, जि.प. सदस्य मनोज डोंगरे, रजनी गौतम, कैलाश पटले, सुरेश हर्षे, किशोर तरोणे, मनोहर चंद्रिकापुरे, महेश जैन, अविनाश काशिवार, प्रेमकुमार रहांगडाले, तुकाराम बोहरे, केवल बघेले, प्रभाकर दोनोडे, लोकपाल गहाणे, नामदेव डोंगरवार, रफीक खान, विनोद पटले, मोहन पटले, आशा पाटील आदी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: NCP's attackball movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.