द्वेषपूर्ण नीतींमुळे राष्ट्रवादीचा जनाधार घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 09:39 PM2018-03-04T21:39:43+5:302018-03-04T21:39:43+5:30

एकीकडे आमदार गोपालदास अग्रवाल लोकप्रतिनिधीचे दायीत्व पूर्ण जबाबदारीने सांभाळत आहेत. तर दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांकडून गंभीर विषयांतही निराशा हाती येत आहे.

 NCP's base will be reduced due to hateful policies | द्वेषपूर्ण नीतींमुळे राष्ट्रवादीचा जनाधार घटला

द्वेषपूर्ण नीतींमुळे राष्ट्रवादीचा जनाधार घटला

Next
ठळक मुद्देचुन्नीलाल बेंद्रे : कॉंग्रेस पक्षात प्रवेश

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : एकीकडे आमदार गोपालदास अग्रवाल लोकप्रतिनिधीचे दायीत्व पूर्ण जबाबदारीने सांभाळत आहेत. तर दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांकडून गंभीर विषयांतही निराशा हाती येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या द्वेषपूर्ण नीतींमुळेच पक्षाचा जनाधार घटत असून आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कॉंग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे मत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चुन्नीलाल बेंद्रे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस रामराम ठोकत बेंद्रे यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करीत आपल्या भावना व्यक्त केल्या. कॉंग्रेस पक्षात प्रवेश करताना त्यांनी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता संमेलनात वॉर्ड व ग्रामस्तरावर पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली.
मात्र दुखाची बाब अशी की, पक्षात राष्ट्रीयस्तरावरील नेते असूनही पर्यवेक्षकांच्या नियुक्तीसाठी भंडारा जिल्ह्यातील नेते आणावे लागत असल्याचे सांगीतले.
बाजार समितीतील गंभीर विषयांवर राष्ट्रवादीतील नेत्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता नेहमीच निराशा हाती येत होती. त्यात मात्र आमदार अग्रवाल यांनी बाजार समितीच्या विकासासाठी जे प्रयत्न केलेत ते सर्वांच्या समक्ष आहेत. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अंतर्गत लोकतंत्र संपले असून पक्ष पूर्णपणे प्रायवेट लिमीटेड कंपनीच्या तत्वावर चालविले जात असून यामुळेच आमदार अग्रवाल यांच्या प्रगतीशील नेतृत्वावर विश्वास ठेवून कॉंग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे बेंद्रे यांनी कळविले.
याप्रसंगी आमदार अग्रवाल यांचे प्रतिनिधी म्हणून विशाल अग्रवाल यांनी जससंपर्क कार्यालयात बाजार समिती उपसभापती धनलाल ठाकरे, संचालक सुरेश अग्रवाल, अरूण दुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचा दुपट्टा घालून बेंद्रे यांचे स्वागत केले.

Web Title:  NCP's base will be reduced due to hateful policies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.