इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे धरणे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:21 AM2021-07-15T04:21:15+5:302021-07-15T04:21:15+5:30

मागील काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या किमती सतत वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक ...

NCP's protest against fuel price hike () | इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे धरणे ()

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे धरणे ()

Next

मागील काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या किमती सतत वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. एवढेच नव्हे, तर खाद्यतेलाच्या किमतीसुध्दा वाढल्यामुळे सर्वसामान्य माणसाला मोठा फटका बसत असून, गृहीणींचे बजेट बिघडले आहे. दरवाढीने नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येला केंद्र सरकार पूर्णपणे जवाबदार असून, जनतेच्या भल्यासाठी सरकारकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचे चित्र आहे. इंधन व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे दिलेल्या निवेदनातून केली आहे. धरणे आंदोलनाचे नेतृत्व माजी जि. प. सदस्या दुर्गा तिराले, जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रभाकर दोनोडे, तालुकाध्यक्ष गोपाल तिराले यांनी केले. कैलाश धामडे, ओमप्रकाश उपराडे, गोविंद मरस्कोल्हे, ओमकार दसरिया, सुखदास बसेना, पूजा वरखडे, गीता चौधरी, रंभा वाढवे, सुनीता येडे, रेखा मेहरे, भागरता कटेवार, कल्पना कोल्हारे, इमला भोयर, प्रमिला येडे, कमलेश लिल्हारे, दौलत अग्रवाल, लखन टेकाम, रेखा ओकटे, ललीता उईके, इमला ठाकरे, उषा मेहरे, राधा ठाकरे, अनिता टेकाम आदी कार्यकर्ते सहभागी झाले. होते.

Web Title: NCP's protest against fuel price hike ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.