कृषक सहकारी संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

By admin | Published: April 10, 2016 02:08 AM2016-04-10T02:08:52+5:302016-04-10T02:08:52+5:30

गोंदिया तालुका सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलने बहुमत प्राप्त केले.

NCP's supremacy on Farmers' Co-operative Society | कृषक सहकारी संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

कृषक सहकारी संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

Next

गोंदिया : गोंदिया तालुका सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलने बहुमत प्राप्त केले. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ संचालक निवडून आले. नवनिर्वाचित संचालकांचे राष्ट्रवादी काँग्रेस भवनात आ. राजेंद्र जैन तथा पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष कुंदन कटारे, तालुकाध्यक्ष बाळकृष्ण (छोटू) पटले, जि.प. सदस्य रजनी गौतम, कृउबास संचालक अखिलेश सेठ, तालुका युवक अध्यक्ष नवनिर्वाचित सदस्यामध्ये अंचल गिरी, रमेश गौतम, जितेश टेंभरे, डॉ. नितीन तुरकर, मदन चिखलोंढे, हौसलाल बिसेन, भूवन प्रधान, सेवकपुरी बैकुंठी, लक्ष्मी पटले यांचा समावेश आहे. यावेळी पूनाप्रसाद लिल्हारे, पवन पटले, केवलराम रहांगडाले, अनिल बावनकर, नेमीचंद ढेकवार, नुरुनाथ बिहारी, नेऊ नगरे, सतीश कोल्हे, रुपकुमार गौतम, मनोज कटकवार, कवास, महतबाई, दुली बोरकर, निहालसिंग तुरकर, मुन्ना प्रधान, उमेंद्र पाचे, मदन पटले, राजेश सोंडे, प्रल्हाद महंत, प्रदीप चौधरी, परमानंद लांजेवार, अनिल सहारे, धुरनलाल पारधी, खिमेंद्रनाथ, दुर्गा बहादुर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: NCP's supremacy on Farmers' Co-operative Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.