न.प. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 09:37 PM2019-08-04T21:37:40+5:302019-08-04T21:38:20+5:30

राज्य सरकारने शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू केला होता. मात्र यातून नगर परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात आले होते. शासनाच्या दुजाभावामुळे शिक्षकांमध्ये रोष व्याप्त होता. दरम्यान राज्य सरकारने शुक्रवारी नगर परिषद व नगर पंचायत अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे या निर्णयाचा लाभ राज्यभरातील १६ हजार शिक्षकांना होणार आहे.

NE Seventh pay commission applicable to employees | न.प. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

न.प. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

Next
ठळक मुद्देराज्यातील १६ हजार शिक्षकांना होणार लाभ : संघटनेचा यशस्वी पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य सरकारने शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू केला होता. मात्र यातून नगर परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात आले होते. शासनाच्या दुजाभावामुळे शिक्षकांमध्ये रोष व्याप्त होता. दरम्यान राज्य सरकारने शुक्रवारी नगर परिषद व नगर पंचायत अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे या निर्णयाचा लाभ राज्यभरातील १६ हजार शिक्षकांना होणार आहे.
राज्यात बहुतेक ठिकाणी महानगरपालिका आणि नगर परिषद, नगर पंचायत अंतर्गत प्राथमिक शाळा असून यात जवळपास १६ हजार शिक्षक कार्यरत आहे.शासनाने सातवा वेग लागू करण्याचा निर्णय घेतांना मात्र यातून नगर परिषदे अंतर्गत कार्यरत शिक्षकांना वगळले होते. त्यामुळे नगर परिषद आणि नगर पंचायत अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांमध्ये रोष व्याप्त होता.नगर परिषदे अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांबाबतचा दुजाभाव दूर करण्यात यावा, यासाठी शिक्षक सहकार संघटनेचे विभागीय अध्यक्ष रविंद्रकुमार अंबुले,रविंद्र तिजारे,सुरेंद्र गौतम, संदीप खर्डे,चंद्रकांत सहारे,प्रशांत पांडे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ जुलै रोजी भेट घेऊन त्यांना हा दुजाभाव दूर करुन सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली होती. तसेच यासाठी सातत्याने पाठपुरवा सुरू ठेवला होता. त्याची दखल शासनाने २ आॅगस्ट २०१९ रोजी नगर परिषद, नगर पंचायत अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला.
यासंबंधीचा जीआर सुध्दा शासनाचे सचिव सं.श.गोखले यांनी काढला आहे.त्यामुळे या निर्णयाचा लाभ राज्यातील १६ हजार शिक्षकांना होणार असून त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

Web Title: NE Seventh pay commission applicable to employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.