जिल्ह्यातील २३ हजार महिला व बालकांना अमृत आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:33 AM2021-03-01T04:33:20+5:302021-03-01T04:33:20+5:30

गोंदिया : भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त उपाययोजना क्षेत्रातील गरोदर, स्तनदा मातांना ...

Nectar food for 23,000 women and children in the district | जिल्ह्यातील २३ हजार महिला व बालकांना अमृत आहार

जिल्ह्यातील २३ हजार महिला व बालकांना अमृत आहार

Next

गोंदिया : भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त उपाययोजना क्षेत्रातील गरोदर, स्तनदा मातांना एकवेळचा सकस आहार व ७ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालकांसाठी अंडी व केळी दिली जाते.

सन २०२०-२१ मध्ये ४ कोटी अमृत आहार योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यात आले. ही योजना गोंदिया जिल्ह्यातील देवरी, आमगाव, सडक-अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व आमगाव या पाच तालुक्यांतील निवडक अंगणवाड्यांमधून राबविली जात जाते. अनुसूचित जमातीच्या गरोदर व स्तनदामाता यांना ६ महिने अमृत आहार दिला जातो. गोंदिया जिल्ह्यात आजघडीला १६२९ गरोदर माता तर १९६२ स्तनदा माता आहेत. एक वेळचा चौरस आहार म्हणून ३५ रुपये दिले जाते. महिन्याकाठी २५ दिवसांसाठी आहार तर वर्षाकाठी ३०० दिवसांच्या पोटी ३५ रुपयेप्रमाणे गरोदर व स्तनदा मातांना दिला जातो. ७ महिने ते ६ वर्षांतील बालकांना एक वेळ अंडी महिन्यातून १६ दिवस दिली जातात. त्यापोटी ६ रुपये प्रतिदिवस प्रमाणे हे पैसे दिले जातात. जिल्ह्यातील १९ हजार ६४४ बालकांना या अमृत आहार योजनेचा लाभ देण्यात येत आहे. महिला व बालके मिळून २३ हजार २३५ लाभार्थ्यांना अमृत आहार योजनेचा लाभ देण्यात येतो.

बाॅक्स

तालुका लाभार्थी आहारापोटी दिलेली रक्कम

देवरी - १०९९४ - १८०४५३००

अर्जुनी-मोरगाव -४३६७- ७६०२०००

आमगाव ३४३- ८५५२००

सडक-अर्जुनी ४५२८- ७२३६०००

सालेकसा २९७६- ६२६१५००

एकूण २३२३५- ४ ०००००००

Web Title: Nectar food for 23,000 women and children in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.