गरज ११ व्हेंटीलेटरची; काम भागवितात दोनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 09:24 PM2019-04-29T21:24:18+5:302019-04-29T21:24:48+5:30

येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनेक अनागोंदी कारभार पुढे येत असून रुग्णालयात विविध सोयी सुविधांचा अभाव असल्याने एकप्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळले जात आहे. या रुग्णालयातील रुग्णांची संख्या लक्षात घेता ११ वेंटीलेटरची गरज असताना मात्र केवळ दोन व्हेंटिलेटरवर काम भागविले जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

Need 11 Ventilator; Work is done on both sides | गरज ११ व्हेंटीलेटरची; काम भागवितात दोनवर

गरज ११ व्हेंटीलेटरची; काम भागवितात दोनवर

Next
ठळक मुद्देकेटीएस रुग्णालय : चार महिन्यांपासून पुरवठा नाही, रुग्णांच्या जीवाशी खेळ

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनेक अनागोंदी कारभार पुढे येत असून रुग्णालयात विविध सोयी सुविधांचा अभाव असल्याने एकप्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळले जात आहे. या रुग्णालयातील रुग्णांची संख्या लक्षात घेता ११ वेंटीलेटरची गरज असताना मात्र केवळ दोन व्हेंटिलेटरवर काम भागविले जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
जिल्ह्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी गोंदिया केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय सुरू करण्यात आले. यामुळे रुग्णांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा मिळतील ही अपेक्षा होती. मात्र आता येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होवून सुध्दा रुग्णांना आरोग्याविषयक सोयी सुविधा मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
सीटीस्कॅन, रक्ततपासणी सारख्या सेवा बंद राहत असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागत आहे. यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. केटीएस रुग्णालयात दररोज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या चारशेच्या वर आहे. त्या दृष्टीने रुग्णालयाने २०१३ मध्ये ६ वेंटीलेटर घेतले होते. तसेच याच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी नागपूर येथील एका कंपनीला दिली. मात्र सहापैकी सध्या स्थितीत केवळ दोनच वेंटीलेटर सुरू असून ४ वेंटीलेटर नादुरूस्त आहे. मात्र अद्यापही त्यांची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे दोन वेंटीलेटरवर काम सुरू आहे.
एखाद्यावेळेस अतिदक्षता गृहात रुग्णांची संख्या वाढल्यास काय होणार असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.मागील तीन वर्षांपासून केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी वेंटीलेटरची समस्या लक्षात घेवून ७ नवीन वेंटीलेटर खरेदीचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली असून चार महिन्यापूर्वीच पैसे देखील प्राप्त झाले. त्यानंतर शासनाने नियुक्त केलेल्या हॉपकिन्स कंपनीकडे वेंटीलेटर खरेदीसाठी पैसे भरले मात्र या कंपनीने अद्यापही व्हेंटिलेटरचा पुरवठा केला नाही. त्यामुळे केवळ दोनच वेंटीलेटरवर रुग्णालयाचे काम सुरु आहे.
तर वेंटीलेटर देखभाल दुरूस्तीचे कंत्राट घेतलेल्या नागपूर येथील कंपनीने ३ वेंटीलेटर दोन तीन दिवसात दुरूस्ती करुन पाठविणार असल्याचे अधिष्ठाता व्ही.पी.रुखमोडे यांनी सांगितले.
एकंदरीत केटीएस रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाºया सर्वच सुविधा आॅल ईज वेल नसल्याचे चित्र असून याकडे आरोग्य विभागाचे सुध्दा दुर्लक्ष झाले आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासणार
केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील अतिदक्षता विभागात मुदतबाह्य इंजेक्शन आढळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. त्यामुळे हे इंजेक्शन नेमके येथे आणले कोणी याचा शोध घेण्यासाठी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी चौकशी समिती करणार असल्याची माहिती आहे.
मुदतबाह्य इंजेक्शन आले कुठून
येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दोन प्रकारचे मुदतबाह्य इंजेक्शन आढळल्याची घटना पाच दिवसांपूर्वीच उघडकीस आली होती. त्यानंतर रुग्णालयात चांगली खळबळ उडाली होतीे. मात्र रुग्णालयात आढळलेले ते दोन्ही इंजेक्शन रुग्णालयातील नसून बाहेरुन आल्याची बाब चौकशीत पुढे आली आहे. रुग्णालयाला पुरवठा करण्यात आलेले इंजेक्शनचे बॅच क्रमांक आणि आढळलेल्या इंजेक्शनचे बॅच क्रमांक यात तफावत असून अतिदक्षता विभागात हे मुदतबाह्य इंजेक्शन नेले कुणी याचा शोध रुग्णालय व्यवस्थापन घेत आहे.

रुग्णालयातील वेंटीलेटरची समस्या लक्षात घेवून चार महिन्यापूर्वीच खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. लवकरच नवीन ७ वेंटीलेटरचा पुरवठा हॉपकिन्स कंपनीकडून रुग्णालयाला होईल. तसेच मुदतबाह्य इंजेक्शन प्रकरणाची सुध्दा चौकशी सुरु असून लवकरच याचा अहवाल देण्यात येईल.
-व्ही.पी.रुखमोडे,
अधिष्ठाता
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.

Web Title: Need 11 Ventilator; Work is done on both sides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.