बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत उभारण्याची गरज- आठवले
By Admin | Published: June 1, 2017 01:07 AM2017-06-01T01:07:58+5:302017-06-01T01:07:58+5:30
सम्राट अशोकाने बुध्द धम्माचा स्वीकार केल्यांतर बुध्द धम्माचा प्रचार-प्रसारही जगभर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील बुध्द धम्म स्वीकारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : सम्राट अशोकाने बुध्द धम्माचा स्वीकार केल्यांतर बुध्द धम्माचा प्रचार-प्रसारही जगभर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील बुध्द धम्म स्वीकारला. संपूर्ण भारत बौध्दमय करणार असे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत उभा करण्याकरीता आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
कोहमारा येथे आयोजित भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या अनावरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, प्रमुख अतिथी म्हणून महोथेरो भदंत राहुल बोधी, जि.प.उपाध्यक्षा रचना गहाणे, भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील, जि.प.सदस्या माधुरी पातोडे, शिला चव्हाण, आदिवासी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, भूपेंद्र गणवीर, पं.स.सदस्य गिरीधारी हत्तीमारे, भंते संघधातू, राजेश कठाणे, वसंत गहाणे, रोशन बडोले, भरत क्षत्रिय, जयंत शुक्ला, नायब तहसीलदार मेश्राम, गटविकास अधिकारी लोकरे, रतन वासनिक, प्रदीपसिंह ठाकूर, डी.जी.रंगारी, हेमंत भांडारकर, नितीन गजभिये, सरपंच माया उके, उपसरपंच प्रल्हाद वरठे, पोलीस पाटील अनिल दिक्षीत, शालिनी डोंगरे उपस्थित होते.
ना. आठवले पुढे म्हणाले की, डॉ, आंबेडकरांच्या स्वप्नातील गाव उभा राहील तेव्हाच भारत उभा करता येईल. यासाठी आर्थिक विषमतेला दूर सारणे गरजेचे आहे. याशिवाय आर्थीक समता प्रस्थापित होणार नाही, असेही ते म्हणाले. याप्रसंगी पालकमंत्री राजकुमार बडोले म्हणाले, लोकशाही प्रधान देशात स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वांचा विचार केला जात नाही. अजूनही आर्थिक, धार्मिक, सामाजिक समता निर्माण झाली नाही. आजही जाती-जातीमध्ये दंगली आणि भांडण सुरु आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेतले तरच त्याला स्वत:ची प्रगती करता येणार अस म्हणाले. शाक्यमुनी बुध्द विहारातील गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी भंते यांना चिवरदान देण्यात आले.