सक्षम जनप्रतिनिधीला ताकद देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 11:55 PM2019-08-06T23:55:52+5:302019-08-06T23:56:17+5:30

तालुक्यात जास्तीतजास्त घरकुलांना मंजुरी, स्वच्छतेसाठी जास्तीतजास्त नाल्या व शौचालयांचे बांधकाम, गावातच आरोग्य सुविधा मिळावी यासाठी उपकेंद्र तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व सामान्यांपर्यंत शासकीय योजन पोहचाव्या यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.

The need to empower a competent public representative | सक्षम जनप्रतिनिधीला ताकद देण्याची गरज

सक्षम जनप्रतिनिधीला ताकद देण्याची गरज

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम बिरसोला येथील विकासकामांचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यात जास्तीतजास्त घरकुलांना मंजुरी, स्वच्छतेसाठी जास्तीतजास्त नाल्या व शौचालयांचे बांधकाम, गावातच आरोग्य सुविधा मिळावी यासाठी उपकेंद्र तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व सामान्यांपर्यंत शासकीय योजन पोहचाव्या यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. क्षेत्राच्या विकासासाठी सक्षम जनप्रतिनिधीला ताकद देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम बिरसोला-भाद्याटोला येथे २१ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर रस्ता गट्टूकरण व सिमेंट रस्ता बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, क्षेत्रातील बाघ सिंचन प्रकल्पाचे कालवे साफ करवून जास्तीतजास्त पाणी शेतात पोहचत आहे. रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात बिरसोला-भाद्याटोला-बाजारटोला-काटी या क्षेत्राला सम्मिलीत करून क्षेत्राला सुजलाफ-सुफलाम करण्याचे स्वप्न आहे.
बाघ नदीवर डांगोरली जवळ बंधारा बांधकामाचे प्रयत्प अंतीम टप्प्यात असून त्यांनतर क्षेत्रात १०० वर्षे सिंचन व पिण्याच्या पाणी समस्या जाणवणार नसल्याचेही त्यांनी सांगीतले.
प्रास्ताविक सरपंच कत्तेलाल मात्रे यांनी मांडले. याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य लोकचंद दंदरे, जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, ओमप्रकाश भक्तवर्ती, बबीता देवाधारी, आनंद तुरकर, आशिष चव्हाण, देवेंद्र मानकर, निर्वता पाचे, झनकसिंग तुरकर, कपूरचंद पाचे, रामभगत पाचे, कांती पाचे, डॉ. देवा जमरे, ्रकविता दंदरे, सरोजनी दंदरे, डिलेश्वरी पाचे प्रीती तुरकर, सुरवन पाचे, नेतलाल मात्रे, केशव नागफासे, महेश देवाधारी, मोहपत खरे यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.

Web Title: The need to empower a competent public representative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.