उघड्यावर थुंकणाऱ्यांना दणका देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:14 AM2021-01-13T05:14:46+5:302021-01-13T05:14:46+5:30

गोंदिया : शिंकल्याने तसेच थुंकल्याने आपल्या लाळेतून उडणाऱ्या तुषारांपासून कोरोनाचा झपाट्याने प्रसार होतो. ही बाब लक्षात कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी ...

The need to hit those who spit in the open | उघड्यावर थुंकणाऱ्यांना दणका देण्याची गरज

उघड्यावर थुंकणाऱ्यांना दणका देण्याची गरज

googlenewsNext

गोंदिया : शिंकल्याने तसेच थुंकल्याने आपल्या लाळेतून उडणाऱ्या तुषारांपासून कोरोनाचा झपाट्याने प्रसार होतो. ही बाब लक्षात कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी व सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांना तोंडावर मास्क लावण्यास सांगीतले जात आहे. विशेष म्हणजे, मध्यंतरी कोरोनाचा प्रार्दुभाव बळावला असताना उघड्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. मात्र आता कारवाई बंद असल्याने अशा बेजबाबदार नागरिकांना रान मोकळे असून, सार्वजनिक जागांवर ते बिनधास्त थुंकत असताना दिसत आहेत.

देशात कोरोना शिरकाव झाल्यानंतर मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर अवघ्या जगातच नागरिकांना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. बाधित व्यक्तीच्या शिंकल्याने तसेच बोलताना वा थुंकल्याने तोंडातून निघणाऱ्या लाळेतील तुषार हवेत उडतात व त्याच्या संपर्कात येणारी व्यक्तीही बाधित होऊ शकते. यासाठीच तोंडावर मास्क लावणे बंधनकारक करून उघड्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. परिणामी याला थोड्या प्रमाणात प्रतिबंध लागला होता. मात्र आता मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा कहर कमी झाला असून, बाधितांची संख्या कमी झाली आहे. परिणामी जिल्हा प्रशासनाकडूनही पूर्वी होती ती सक्ती शिथिल करण्यात आली आहे. याचा गैरफायदा काही बेजबाबदार नागरिक घेत आहे. कित्येक नागरिक सार्वजनिक स्थळी उघड्यावरच सर्रास थुंकताना दिसून येत आहेत. गाडीवर जात असतानाच थुंकणे, गुटखा खावून भर रस्त्यावर थुंकणे आदी प्रकार गोंदिया शहरात अगदी क्षुल्लक झाले आहेत. मात्र याकडे आता जिल्हा व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

-------------------------------------

गुटखा खाणाऱ्यांमुळे सर्वाधिक धोका

दिवसभर तोंडात गुटखा भरून ठे‌वणारे जागा मिळेल तेथे थुंकतात. हा प्रकार अत्यधिक धोक्याचा असून, अशात एखाद्या बाधितापासून कित्येकांना कोरोनाच व अन्य संसर्गजन्य आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता आता जिल्हा प्रशासनाने पुन्हा उघड्यावर थुंकणाऱ्यांना चांगलाच दणका देण्याची मागणी शहरातील सुज्ञ नागरिक करीत आहेत.

---------------------------

Web Title: The need to hit those who spit in the open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.