विद्यापीठातील ज्ञान, तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:43 AM2019-08-18T00:43:42+5:302019-08-18T00:44:04+5:30

विद्यापीठ कृषी, आत्मा व संबंधित संलग्न विभागांनी एकत्र येवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पुढे यावे. विद्यापीठातील ज्ञान व तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये कसा वापर होईल, याचा प्रामुख्याने विचार करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर यांनी केले.

The need for knowledge of the university, the use of technology in agriculture | विद्यापीठातील ज्ञान, तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर काळाची गरज

विद्यापीठातील ज्ञान, तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर काळाची गरज

Next
ठळक मुद्देडी.एम. मानकर। १६ वी शास्त्रीय कृषी सल्लागार परिषदेत शेतीवर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : विद्यापीठ कृषी, आत्मा व संबंधित संलग्न विभागांनी एकत्र येवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पुढे यावे. विद्यापीठातील ज्ञान व तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये कसा वापर होईल, याचा प्रामुख्याने विचार करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथे १६ व्या शास्त्रीय सल्लागार समितीच्या सभेत ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
यावेळी डॉ. व्ही. जी. नागदेवते, नागभीडचे उपविभागीय कृषी अधिकारी डी. एम. तपासकर, नागभीडचे तालुका कृषी अधिकारी एस. व्ही. भारती. सिंदेवाहीच्या कृषी अधिकारी दिव्या मोरे, आव्हाड, पी. पी. दळवी, स्वप्निल वनवे, पी. के. राठोड, डॉ. पारीश नलावडे, वनपरीक्षेत्र अधिकारी व्यंकटेश जंगीलवाड, वनक्षेत्र सहाय्यक ए. पी. करडे, हेमंत शेंदरे, शामसुंदर बन्सोड, रामविजय गड्डमवार, संगिता चहांदे, निलेश रस्से, शास्त्रज्ञ डॉ. व्ही. एम. सिडाम, डॉ. सोनाली लोखंडे, प्रा. पी.पी. देशपांडे, प्रा. सेन्हा वेलादी, प्रा. के. जी. मांडवडे उपस्थित होते. डॉ. डी. एम. मानकर म्हणाले, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाने कृषी क्षेत्रात मोलाचे संशोधन केले. या संशोधनाचा लाभ ग्रामीण व आदिवासी भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रांनी जोमाने प्रयत्न केले पाहिजे. शेतकºयांना ज्ञान व संशोधनाशी जोडून घेतल्यास दुप्पट उत्पन्न साध्य करणे शक्य होऊ शकेल. अन्य मान्यवरांनीही विचार मांडले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे समन्वयक व्ही. जी. नागदेवते यांनी कार्यालयाचा २०१८-१९ चा प्रगती अहवाल सदर केला. संचालन डॉ. सोनाली लोखंडे यांनी केले. आभार स्रेहा वेलादी यांनी केले. आयोजनासाठी सुशांत डंबोळे निलकमल बारसागडे, माने व कृषी संशोधन विज्ञान केंद्रातील विद्यार्थी कर्मचाºयांनी सहकार्य केले.

Web Title: The need for knowledge of the university, the use of technology in agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती