दीर्घकालीन उपाययोजनांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2016 01:55 AM2016-04-10T01:55:17+5:302016-04-10T01:55:17+5:30

दुष्काळी परिस्थितीशी लडण्यासाठी सरकार तात्पुरता पाणी पुरवठा व अस्थायी शिबिर लावून जनतेत स्वस्त लोकप्रियता लुटण्याचे प्रयत्न करीत आहे.

The need for long-term measures | दीर्घकालीन उपाययोजनांची गरज

दीर्घकालीन उपाययोजनांची गरज

Next

गोपालदास अग्रवाल : दुष्काळी परिस्थितीवर विधानसभेत केली मागणी
गोंदिया : दुष्काळी परिस्थितीशी लडण्यासाठी सरकार तात्पुरता पाणी पुरवठा व अस्थायी शिबिर लावून जनतेत स्वस्त लोकप्रियता लुटण्याचे प्रयत्न करीत आहे. मात्र दुष्काळी परिस्थिशी लडण्यासाठी सरकारने ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केली. राज्य विधानसभेच्या बजेट सत्रात दुष्काळी परिस्थितीवरील चर्चेत ते बोलत होते.
पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, राज्यात सरकारच्या दृढमूल नीतींमुळे ३२०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर शेकडो नागरिक दररोज आपले गाव सोडून शहराकडे जात आहेत. यामुळे शहरातील जलसंकट गंभीर होत चालले आहे. मात्र सरकारी अधिकारी मानवीय दृष्टिकोन सोडून फक्त शासन परिपत्रकाचे पालन करून आपली जबाबदारी पूर्ण करण्याचा देखावा करीत आहे. दुष्काळावर नियंत्रण मिळवायचे असल्यास प्रत्येक तालुकास्तरावर निर्णय घेऊन त्वरीत कारवाई करण्याचे अधिकार दिले पाहिजे असल्याची मागणिही त्यांना केली.
त्याचप्रकारे पूर्व विदर्भात पाणी टंचाई नसून दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. एकट्या गोंदिया जिल्ह्यात ५८ हजार मजूर रोजगार हमी योजनेत कार्यरत आहेत. गंभीर गोष्ट अशी की, दोन मजली घर असणारे शेतकरीही रोहयोच्या कामांवर जात आहेत. ५२-५५ टक्के आणेवारी असलेले गावही पूर्णपणे दुष्काळग्रस्त घोषीत झाले नाहीत. तर २०० रूपयांचा बोनसही शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचता मधातील दलाल व व्यापारी खात असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणीही आमदार अग्रवाल यांनी केली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The need for long-term measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.