गोंडी संस्कृती टिकवून ठेवण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:08 AM2018-02-03T00:08:34+5:302018-02-03T00:08:45+5:30
कचारगड यात्रेनिमित्त धनेगाव येथील प्रांगणात राष्ट्रीय गोंडवाना महाधिवेशन घेण्यात आले. या महाधिवेशनात देशातील गोंडी समाजाच्या विविध मान्यवरांनी आपापले विचार मांडून गोंडी संस्कृती टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडी धर्मभूमी कचारगड : कचारगड यात्रेनिमित्त धनेगाव येथील प्रांगणात राष्ट्रीय गोंडवाना महाधिवेशन घेण्यात आले. या महाधिवेशनात देशातील गोंडी समाजाच्या विविध मान्यवरांनी आपापले विचार मांडून गोंडी संस्कृती टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.
उद्घाटन जि.प. अध्यक्ष सीमा मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जि.प. महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे होत्या. अतिथी म्हणून जि.प. सदस्य विजय टेकाम, पं.स. सभापती अर्चना राऊत, उपसभापती दिलीप वाघमारे, वासुदेव चुटे, संजय दोनोडे, रीता दोनोडे, देवस्थान समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी कोया पुनेम महोत्सवाच्या महापूजेत आपला सहभाग नोंदविला. जि.प. अध्यक्ष मडावी यांनी कचारगड यात्रेदरम्यान उपलब्ध सोयी-सुविधांचा आढावा घेतला.
याप्रसंगी जिल्हा व तालुका प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. त्यांनी यात्रेदरम्यान भाविकांना उपलब्ध सोयी-सुविधांची माहिती दिली. यात्रेत येणाºया सर्व भाविकांना विविध स्वयंसेवी संस्थांच्या वतीने भोजन व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा आदी पुरविण्यात आल्या आहेत. गुहा परिसरात आबालवृद्ध भाविकांना गुहेपर्यंत जाण्यासाठी पोलीस प्रशासनाने जवान तैनात केले आहेत. कचारगड यात्रेत येणाऱ्या प्रत्येक भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी आ. संजय पुराम घेत आहेत. त्यामुळे स्थानिक समितीसह प्रशासनसुद्धा सोयीसुविधांवर नजर ठेवून आहे.